- खड्ड्यांमुळे पाच नाशिककरांचे बळी गेल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली आहे. युद्ध पातळीवर खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून तर महापौर आणि उपमहापौरांनी देखील रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी केलीय. शहरातील सर्वच भागातील खड्डे तातडीने बुजवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
Pune Live: पुण्यात शिवसेना शिंदे गटाचे आंदोलनपुणे महापालिकेसमोर मुख्य प्रवेशद्वारासमोर पुण्यात शिवसेना शिंदे गटाचे आंदोलन सुरु आहे. महानगरपालिकेच्या गलथान, ढिसाळ व निष्क्रिय कारभाराविरोधात शिवसेना पुणे शहरच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर जोरदार टीकामल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर जोरदार टीका
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "हजारो विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने संसदेकडे मोर्चा काढला होता. त्यांना सरकारशी संवाद साधायचा होता. मात्र, त्यांच्यावर लाठीमार, अश्रुधूर आणि पॅलेट गनचा वापर करण्यात आला. रेल्वे स्थानके आणि इंटरनेटही बंद करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला."
Nagpur Live पुढील चोवीस तासांत विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजभारतीय हवामान विभागाने पुढील चोवीस तासांत विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत विविध जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना सर्वाधिक धोक्याचा लाल इशारा देण्यात आला असून नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी नारिंगी इशारा कायम असताना नागपूरसाठी पिवळा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून सुमारे दोनशे मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही विशेष इशारा नसला तरी नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करून विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरलेठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले
- ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले
- महापौरांना जाब विचारण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले
- सत्ताधाऱ्यांविरोधात ठाकरे सेनेच्या नगरसेवकांची जोरदार घोषणाबाजी
- महापौर येत नाही, तोपर्यंत दालनात आंदोलन सुरूच राहील, ठाकरे सेनेचा इशारा
पंढरपूरच्या वारीवरून परतताना काळाचा घाला! ३ वाहनांचा भीषण अपघात; एका वारकऱ्याचा मृत्यू, ११ गंभीर जखमीपंढरपूरच्या वारीवरून परतताना काळाचा घाला! ३ वाहनांचा भीषण अपघात; एका वारकऱ्याचा मृत्यू, ११ गंभीर जखमी
आषाढी एकादशीची पंढरपूरची वारी पूर्ण करून भक्तीभावाने आपल्या गावी वाशिमला परतणाऱ्या वारकऱ्यांवर काळाने भीषण घाला घातला आहे. बीड जिल्ह्यातील केज-कळंब रस्त्यावरील साळेगावजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात एका वृद्ध वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नशामुख्य अभियानं अंतर्गत मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटननशामुख्य अभियानं अंतर्गत मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
व्यसनाकडे नेणाऱ्यांचे नाव सांगा कारवाई करू
राज्यातील व्यसनाधिन लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
डॅग्जविरोधी कारवाईत टीप देणाऱ्याचे नाव गुपीत ठेवण्यात येईल
सामुहीक पद्धतीने काम केल्यास ड्रग्ज विरोधी कारवाईला मोठी मदत मिळणार आहे.
Parliament Monsoon Session: विद्यार्थी आंदोलनातील कथित गोळीबारावरून लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूबParliament Monsoon Session: विद्यार्थी आंदोलनातील कथित गोळीबारावरून लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी (30 जुलै) लोकसभेत 20 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित गोळीबाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. यामुळे सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालू शकले नाही.
विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. वाढत्या गोंधळामुळे सभापतींनी लोकसभेचे कामकाज दुपारी **2 वाजेपर्यंत तहकूब** करण्याचा निर्णय घेतला.
20 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान कथित गोळीबार झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेवरून संसदेतही तीव्र राजकीय वातावरण निर्माण झाले आहे. विरोधकांनी सरकारकडून स्पष्टीकरण आणि दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
सरकारकडून या प्रकरणावर पुढील भूमिका काय असेल, तसेच सभागृह पुन्हा सुरू झाल्यानंतर हा मुद्दा पुन्हा उपस्थित होण्याची शक्यता आहे.
रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआडरायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
रायगड पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ऑस्कर नावाच्या श्वान चा काल दिर्घ आजाराने मृत्यू झाला आहे. रायगड पोलिसांच्या अनेक मोहिमेत या श्वानाचे महत्वपूर्ण योगदान होते. ऑस्करने 194 वेगवेगळ्या गुन्हे तपासात यशस्वी कामगिरी करून रायगड पोलिसांना मदत केली होती. मृत्यूनंतर रायगडच्या अलिबाग येथील पोलिस परेड मैदानावर पोलिस दलाकडून मानवंदना दिल्यानंतर ऑस्करवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
२४ कॅरेट सोनं ८,२०० रुपयांनी महाग, चांदीचे दर स्थिर२४ कॅरेट सोनं ८,२०० रुपयांनी महाग, चांदीचे दर स्थिर
सराफा बाजारात आज (३० जुलै) व्यवहार सुरू होताच सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदविण्यात आली. विशेषतः २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत तब्बल ८ हजार २०० रुपयांची वाढ झाली असून त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
आजच्या दरानुसार १० तोळे (१०० ग्रॅम) २४ कॅरेट सोन्याचा दर १,४४,३३० रुपये इतका झाला आहे. तसेच २२ कॅरेट सोन्याचा दर १,३२,३०० रुपये, तर १८ कॅरेट सोन्याचा दर १,०८,२५० रुपये प्रति १०० ग्रॅमवर पोहोचला आहे.
दुसरीकडे, चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. १०० ग्रॅम चांदीचा दर २३,५०० रुपये इतकाच कायम आहे.
जागतिक बाजारातील घडामोडी, डॉलरच्या तुलनेतील चलनातील चढ-उतार आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आगामी काळातही आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीनुसार सोने-चांदीच्या किमतींमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
सोने खरेदी किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्यांनी व्यवहार करण्यापूर्वी आपल्या शहरातील अधिकृत सराफा बाजारातील ताजे दर तपासूनच खरेदी करावी.
पुण्यात संगमवाडी पार्किंग क्रमांक तीन जवळ एक कारचा अपघातपुण्यात संगमवाडी पार्किंग क्रमांक तीन जवळ एक कारचा अपघात
रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडाला धडकून गाडीचा अपघात झाला
गाडीमध्ये दोन इसम अडकले होते, गाडीच्या धडकेने झाड खोडासकट तुटून फूटपाथवर पडले.
रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी व कारचालकांनी एका इसमास बाहेर काढले,पोलिसांच्या नागरिकांच्या व येरवडा अग्निशमन केंद्र व कसबा अग्निशमन केंद्राच्या मदतीने स्टेरिंग व दरवाजामध्ये ड्रायव्हरचा पाय अडकला होता.
मॅन्युअल स्प्रेडर,रोपच्या साह्याने सदर व्यक्तीचा पाय सुखरूप बाहेर काढून जखमी व्यक्तीस पोलिसांच्या ताब्यात दिले.
गाडी मधील व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.गाडी क्रमांक MH12 YH 5569 टोयाटो ट्रेसर,रंग पांढरा गाडीचे संपूर्ण नुकसान झाले आहे.
आण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त पुण्यात शनिवारी वाहतुकीत बदलआण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त पुण्यात शनिवारी वाहतुकीत बदल
स्वारगेट आणि सारसबाग परिसरात आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल करण्यात येणार
वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, पोलिसांचे आवाहन
दुपारी २ नंतर बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग
देशभक्त केशवराव जेधे चौक ते सारसबाग: जेधे चौकातून सारसबागकडे जाणारी वाहतूक बंद राहणार
पर्यायी मार्ग: सिंहगड रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी जेधे चौकातून सातारा रस्त्याने सरळ व्होल्गा चौक (लक्ष्मीनारायण चौक) - मित्रमंडळ चौक - स्वातंत्र्यवीर सावरकर चौक मार्गे जावे. सिंहगड रस्त्याकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी दांडेकर पूल - नाथ पै चौक - ना. सी. फडके चौक - पूरम चौक - टिळक रस्ता मार्गे जेधे चौकाकडे
वाय जंक्शन उड्डाणपूल (जेधे चौक) : उड्डाणपुलावरून सारसबागेकडे जाण्यास मनाई तर कात्रजकडून येणाऱ्या वाहनांनी व्होल्गा चौकातून डावीकडे वळावे
वेगा सेंटर ते सारसबाग (ग्रेडसेपरेटर) : ग्रेडसेपरेटरमधून वाहनांना जाण्यास प्रवेश बंद तर वाहनांनी वेगा सेंटरवरून घोरपडे पेठ उद्यान - राष्ट्रभूषण चौक - हिराबाग चौकाकडून इच्छित स्थळी जावे
स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते पूरम चौक : सावरकर चौकापासून पूरम चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहणार. दांडेकर पुलाकडून येणारी वाहतूक नाथ पै चौक - ना. सी. फडके चौक - कल्पना हॉटेलकडून डावीकडे टिळक रस्ता - पूरम चौक मार्गे सुरू राहणार
अमरावती मार्गावर भीषण अपघात, एसटी बसची ट्रकला जोरात धडक, एकाचा मृत्यू, १० जण गंभीर जखमीअमरावती मार्गावर भीषण अपघात, एसटी बसची ट्रकला जोरात धडक, एकाचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी
दर्यापूर-अमरावती मार्गावर एक अत्यंत भीषण रस्ते अपघात घडला. लखापूर फाटा ते आरळा फाटा दरम्यान एसटी बस आणि ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. एसटी बसचे चालक, वाहक आणि ट्रकच्या चालकासह सुमारे ८ ते १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
Jaipur Live : जंतर-मंतरवरील आंदोलकांवरील पोलीस कारवाईच्या निषेधार्थ NSUI नेत्यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनविद्यार्थी संघटनांच्या निवडणुका आणि जंतर-मंतरवरील आंदोलकांवरील पोलीस कारवाईच्या निषेधार्थ NSUI चे तीन नेते गांधी नगर स्थानकाजवळील पाण्याच्या टाकीवर चढले आहेत.
१ ऑगस्टपासून महिलांसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे?१ ऑगस्टपासून महिलांसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी प्रवासासाठी महिलांना एनसीएमसी (NCMC) कार्ड अनिवार्य होणार असल्याच्या चर्चेमुळे विठ्ठलवाडी एसटी आगारात महिला प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. कार्ड नोंदणीसाठी केवळ एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याने आगारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवस कार्ड तयार करणारी मशीन बंद असल्याने अनेक महिलांना परत जावे लागल्याची तक्रार आहे. तसेच, नोंदणी प्रक्रिया सायंकाळी पाच वाजेपर्यंतच होत असल्याने अनेकांना निराश होऊन घरी परतावे लागत आहे.
१ ऑगस्टपासून एनसीएमसी कार्ड नसल्यास पूर्ण तिकीट आकारले जाईल, अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत असली तरी एसटी प्रशासनाने अद्याप अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी होत आहे.
राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरलेBreaking Marathi News live Updates 30 July 2026 : कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाचे स्वयंचलित दरवाजे केव्हाही उघडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भोगावती नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता भोगावती नदीपात्र तसेच नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीत उतरणे टाळावे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
राधानगरी धरणाची सकाळी ७ वाजताची स्थिती
पाणीपातळी: 347.12 फूट
पाणीसाठा: 8,288.59 Mcft
BOT विसर्ग: 1,400 क्युसेक
एकूण विसर्ग: 1,400 क्युसेक
स्थिती: धरण 100 टक्के भरले