सॅमसंग गॅलेक्सी एस26 अल्ट्रा 'या' पॉवरफूल फोनच्या किमतीत मोठी घट, 24 हजार 124 रूपयांनी झाली स्वस्त
Tv9 Marathi July 30, 2026 08:45 PM

स्मार्टफोनच्या किमती हळूहळू वाढत असताना सॅमसंगच्या फ्लॅगशिप फोन गॅलेक्सी एस26 अल्ट्राची किंमत 24 हजार 124 रूपयांनी कमी करण्यात आली आहे. हा फोन तुम्हाला त्याच्या लाँच किमतीपेक्षा खूपच स्वस्त खरेदी करता येणार आहे. कंपनीच्या गॅलेक्सी अनपॅक्ड 2026 इव्हेंटच्या आधी फ्लिपकार्टवर एस26 अल्ट्रा मोठ्या सवलतीत विकला जात आहे. जर तुम्ही या पॉवरफूल सॅमसंग फोनची किंमत कमी होण्याची वाट पाहत असाल, तर फ्लिपकार्ट वरील ही डील तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग सॅमसंगच्या या फोनच्या किंमतीत घट झाल्यानंतर हा फोन कोणत्या किमतीत तुम्हाला खरेदी करता येईल त्याबद्दल जाणून घेऊयात.

भारतात सॅमसंग गॅलेक्सी एस26 अल्ट्राची किंमत

सॅमसंग गॅलेक्सी एस26 अल्ट्राचा 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 1 लाख 39 हजार 999 रूपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. लाँच झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच, हा फोन आता फ्लिपकार्टवर 1 लाख 15 हजार 875 रूपयांना विकला जात आहे, जी त्याच्या लाँच किमतीपेक्षा 24 हजार 124 रूपयांची सूट आहे. उत्पादनावरील सवलतीव्यतिरिक्त जर तुमच्याकडे फ्लिपकार्ट ॲक्सिस किंवा फ्लिपकार्ट एसबीआय बँक कार्ड असेल तर तुम्हाला अतिरिक्त 4 हजार रूपयांची सूट देखील मिळेल.

तुमचा जुना फोन देऊन सुद्धा 60 हजार 300 रूपयांपर्यंतची एक्सचेंज डिस्काउंटचा लाभ मिळेल. परंतु एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल. हा फोन या रेंजमध्ये आयफोन एअर आणि गूगल पिक्सल 10 प्रो एक्सएल सारख्या स्मार्टफोन्सशी स्पर्धा करतो.

सॅमसंग गॅलेक्सी एस26 अल्ट्राची वैशिष्ट्ये

डिस्प्ले: या पॉवरफूल फोनमध्ये 6.9-इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे, तुम्हाला हा फोन 120Hz रिफ्रेश रेट, 90.30 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो आणि HDR10 प्लस सपोर्टसह मिळेल, याशिवाय 2600 nits ची कमाल ब्राइटनेस देखील आहे.

प्रोसेसर: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, सॅमसंगने या फ्लॅगशिप फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 3 चिपसेटचा वापर केला आहे.

कॅमेरा सेटअप: फोनच्या मागील बाजूस 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, 10 मेगापिक्सेलचा टेलीफोटो सेन्सर, 50 मेगापिक्सेलचा 5एक्स पेरिस्कोप लेन्स आणि 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल सेन्सर आहे. 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. हा फोन खास एस पेन स्टायलसला देखील सपोर्ट करतो.

बॅटरी: या फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी असून तो 60W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.