…तसं केलं की टोमणा मारतो! प्रिया सरोज रिंकु सिंहबाबत काय म्हणाली? एक गुपितही केलं उघड
GH News July 30, 2026 08:12 PM

रिंकु सिंहची होणारी पत्नी आणि समाजवादी पक्षाची खासदार प्रिया सरोज यांची एक मुलाखत सोशल मीडियावर चर्चेत आहे. या मुलाखतीत तिने आपल्या नात्याबाबत बरंच काही सांगितलं आहे. प्रिया सरोजच्या बहिणीच्या फूड ब्लॉगिंग पेजला प्रमोट करण्यासाठी दोघांची इंस्टाग्रामवर पहिली भेट झाली होती. त्यांनंतर प्रिया यांनी रिंकूची इंस्टाग्राम प्रोफाइल पाहिली आणि त्याच्या एका फोटोला ‘लाईक’ केले. फोटो लाईक केल्याचे पाहिल्यानंतर रिंकूने स्वतःहून पुढाकार घेत प्रिया यांना “हाय, हॅलो, कशा आहात?” असा मेसेज पाठवला. येथूनच त्यांच्या संभाषणाची खरी सुरुवात झाली होती. त्यानंतर प्रेमात पडले आणि लग्नाचा निर्णय घेतला आहे. रिंकु आणि प्रिया यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. आता नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2026 मध्ये दोघंही लग्नबंधनात अडकणार आहेत. रिंकु सिंह कसा वागतो? त्या काय आवडतं? का केलं की रागवतो? याबाबत प्रिया सरोजने खुलास केला आहे. इतकंच काय तर रिंकु सिंहचं एक गुपितही तिने उघड केलं आहे.

रिंकु सिंह प्रिया सरोजला का ओरडतो?

प्रिया सरोजने एका मुलाखतीत सांगितलं की, रिंकु सिंह त्याच्या डाएटची खूप काळजी घेतो. तसेच प्रियाने काही चुकीचं खाल्लं तर तो तिला ओरडतो. प्रिया सरोजने सांगितलं की, ‘मला खूप ओरडा मिळतो. काहीही गोड खात नाही. शीतपेये पीत नाही. मी व्हाईट सॉसमधला पास्ता भरपूर खाते. तो आजूबाजूला असतो तेव्हा सतत माझ्या टोमणे मारत असतो. हे खाऊ नकोस, ते खाऊ नकोस. व्यायाम करायचा असतो. तो सकाळी उठतो. तो जिममध्ये जातो. तो सराव करतो आणि जेव्हा तो मोकळा असतो, तेव्हा तो मला फोन करून विचारतो की तो कधी फ्री आहे. त्याला सामाजिक जीवन आवडत नाही. तो आपला वेळ एकटाच घालवतो.’

प्रिया सरोजन रिंकुचं गुपित केलं उघड

प्रिया सरोजने सांगितलं की, साखरपुड्याला जबरदस्त नाचले होते. पण रिंकु सिंह लाजत होता. रिंकु पण जबरदस्त नाचतो. पण खूप लाजतो. प्रिया सरोज म्हणाली की, ‘रिंकू सिंग खूप छान नाचतो, पण तो फक्त मित्रांसोबतच नाचतो. तो खूप लाजाळू आहे. तो सामन्यानंतरच्या पार्टीत अप्रतिम नाचतो. मला अजिबात लाज वाटत नाही. मी नाचते.’

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.