घर भाड्याने घेताना घ्या ही खबरदारी
Marathi July 30, 2026 09:25 PM




घर भाड्याने देणे किंवा घेणे या दोन्ही प्रक्रीयांमध्ये लहान लहान गोष्टीही महत्वाच्या असतात. यात जराही गडबड झाली तर फसवणूक होण्याची शक्यताही वाढते. यामुळे ज्यावेळी तुम्ही घर भाड्याने घेता तेव्हा योग्य मार्गदर्शन गरजेचे असते. कारण प्रत्येक राज्यात भाडेकरूंसाठी असलेले नियम आणि कायदेही वेगवेगळे असतात. त्यासाठी काय करावे ते बघूया.

ज्यावेळी तुम्ही भाड्याने घर घेण्यासाठी जाता तेव्हा त्या घराशी संबंधित सर्व कागदपत्रे तपासा.

टायटल डॉक्युमेंट्स महत्वाचे असते त्यामुळे तुम्ही जे घर भाड्याने घेत आहात त्याचा खरा मालक तीच व्यक्ती आहे का हे कळते.

तसेच तुम्ही जे घर भाड्याने घेत आहात ती कॉपरेटीव्ह सोसायटीत आहे की कॉलनीत ते ही तपासावे. त्यासाठी शेअर सर्टीफिकेट तपासावे. कारण शेअर सर्टीफीकेट घराच्या मालकाच्या नावावर असते. त्यामुळे तीच व्यक्ती घरमालक आहे हे स्पष्ट होते.

घर भाड्याने देता येईल की नाही हे सोसायटीच्या एनओसीमधील नियमात नमूद केलेले असते. कारण काही सोसायटी अविवाहीतांना घर नाकारतात. तसेच इतर अटीही या एनओसीमध्ये असतात. त्यामुळे ते तपासावे.

लीज अॅग्रीमेट साधारण ११ महिन्याचे असते त्यानंतर ते रिन्यूही करता येते .त्याची तरतूद अॅग्रीमेंट मध्ये आहे का ते तपासावे.



© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.