Government Schemes: पाचोरा-भडगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात; ५ हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ
esakal July 31, 2026 02:45 AM

नांद्रा (ता.पाचोरा) : पाचोरा-भडगांव विधानसभा मतदार संघासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचा जन्म दिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधुन शासन आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरचा कार्यक्रम दिनांक ३०/०७/२०२६ रोजी सकाळी ११:०० ते सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत मा.आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्या प्रमुख उपस्थित महाराष्ट्र कृषी विकास महामंडळ गिरड रोड पाचोरा येथे उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शासनाच्या योजनांचा लाभ हा सर्व सामान्य नागरीक, शेतकरी, वयोवृद्ध, विद्यार्थी, विविध योजनांचे पात्र लाभार्थी यांना त्याच दिवशी गिळून देणे तसेच विविध योजनांची माहिती देणे होता.

सदर कार्यक्रमाच्या सुरुवात ही राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने करण्यात येवून, प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन आदरांजली वाहुन करण्यात आली. सदर कार्यक्रमामध्ये ग्रामीण व शहरी भागातून ५००० लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हातुन प्रायोगिक तत्वावर तहसिल कार्यालय पाचोरा येथील ११३ व तहसिल कार्यालय भडगाव येथील ५७ लाभार्थी यांना संजय गांधी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. पंचायत समिती पाचोरा अंतर्गत एकुण ०४ लाभार्थी यांना घरकुलाची चावी व प्रशस्तीपत्र देण्यात आले तसेच बचत गटास कर्जाचे वितरण करण्यात आले. शिक्षण विभागातर्गत ०३ विद्यार्थी यांना दिव्यांग साहित्याचे वाटप करण्यात आले. कृषी विभाग अंतर्गत १२ शेतकरी यांना अनुदान तसेच शेती अवजारांचे वाटप करण्यात आले तसेच नगरपालिका पाचोरा भडगाव ०९ लाभार्थी यांना बैंक लिंकेज कर्ज वितरण तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात आला. पशुसंवर्धन विभागांतर्गत ०३ लाभार्थी यांना नाविण्यपूर्ण शेळीगटाचे वाटप करण्यात आली.

कार्यक्राच्या ठिकाणी महसुल शाखा, संजय गांधी योजना, पुरवठा विभाग, कृषी विभाग, महावितरण विभाग, पंचायत समिती, वनविभाग, भुमी अभिलेख, परिवहन मंडळ, पोसिल विभाग, आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, पशुसंवर्धन विभाग, नगरपालिका पाचोरा / भडगाव, राष्ट्रीयकृत बैंक, बीएसएनएल व उमेद या विभागांचे स्टॉल असुन, या सर्व स्टॉल वर लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गंगेश देवरे गुख्याधिकारी पाचोरा यांनी केले तसेच व्यासपीठावर मा. आमदार किशोर आप्पा पाटील, श्री. रोहन घुगे जिल्हाधिकारी जळगाव, श्री. रावसाहेब पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख, श्री. मधुकर काटे गा.जि.प. सदस्य, श्री. संजय पाटील गा.जि.प. सदस्य, श्री. पदमसिंग पाटील गा.जि.प. सदस्य, श्रीमती रेखाताई मालचे नगराध्यक्ष भडगाव, श्री. किशोर बारवकर उपनगराध्यक्ष पावोरा, श्री. गणेश भिमराव पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा, श्री संजय गोहिल नगरसेवक पाचोरा, श्री. रणधिर सोमवंशी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. जळगाव, श्री. भुषण अहिरे उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग पाचोरा, श्री. विजय बनसोडे तहसिलदार पाचोरा, श्रीमती शितल सोलाट तहसिलदार भडगाव, श्री. सुधाकर मुंढे गट विकास अधिकरी पाचोरा, श्री. के. बी. अंजने गट विकास अधिकारी भडगाव उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. विजय ठाकुर प्रा.शि. व विनोद धनगर प्रा.शि. यांनी केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.