नवी दिल्ली : दिल्ली लाल किल्ला स्फोटाप्रकरणी उच्च न्यायालयाने दहशतवादी जासिर बिलाल वानीला जामीन मंजूर करण्यास नकार दिला आहे. एनआयएच्या चौकशीची कालमर्यादा वाढविण्यात आल्याच्या आधारावर जासिरने जामिनाची मागणी केली होती. यापूर्वी सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. सुसाइड बॉम्बर उमर-उन-नबीचा जासिर हा सहकारी आहे. दहशतवाद्यांना तांत्रिक मदत पुरविल्याचा आरोप त्याच्यावर आहे.