Isha Talwar praises Tukaram Mundhe: अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांचाच सर्वत्र बोलबाला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्या हॉटेल्सवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला. त्यांनी धडक कारवाईची मोहिम हाती घेत अनेक हॉटेल्स मालकांना नोटीसा पाठवल्या आहेत. तसेच दुकानांवर कारवाई करत महत्त्वाची भूमिकाही बजावली आहे. सध्या FDA टीमचे धडक कारवाई करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियात (Social media) तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कार्याला सलाम करत अनेक सेलिब्रिटींनी (Entertainment) त्यांचं कौतुक केलं आहे. आता मिर्झापूर फेम अभिनेत्री ईशा तलवार (Isha Talwar) हिनं देखील तुकाराम मुंढेंचं कौतुक केलं आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत त्यांनी तुकाराम मुंढेंचं कौतुक करत एक इच्छाही देखील पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
'मिर्झापूर' या वेब सिरीजमधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री ईशा तलवार हिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिला विशेष ओळख 'मिर्झापूर' या वेब सिरीजमधून मिळाली. अभिनेत्री सोशल मीडियात सक्रीय असते. अभिनेत्रीने नुकतंच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं आपल्या पोस्टच्या माध्यमातून अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचं आपल्या शैलीत कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
अभिनेत्रीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने म्हटलं की, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये जाण्याचा विचार करत आहे', असं तिने म्हटलं आहे. सध्या ईशा तलवारची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काहींनी 'चांगला निर्णय आहे', असं म्हटलं आहे. तर, एकाने, 'लेडी सिंघम.. पण मुंबईमध्ये की गावी?', असा प्रश्न उपस्थित केला आहे.
तर, काही नेटकऱ्यांनी ही प्रेरणादायी पोस्ट असल्याचं म्हटलं आहे. सध्या 'मिर्झापूर' फेम ईशा तलवारचीही पोस्ट सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. अभेनत्री ईशा तलवार हिनं आपल्या कारकिर्दीत हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही काम केलं आहे. तिने आपल्या कारकिर्दीत बऱ्याच प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे. दरम्यान तिला खरी ओळख 'मिर्झापूर' या वेब सिरीजमधून मिळाली. या वेब सिरीजमध्ये तिनं 'माधुरी यादव' ही भूमिका साकारली होती. 'मिर्झापूर'च्या दुसर्या अन् तिसऱ्या सिझनमध्ये झळकली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या: