आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, वाशिमच्या प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी मारुन आयुष्य संपवलं
मनोज जयस्वाल, एबीपी माझा August 19, 2026 03:43 PM

Washim Crime Couple death: वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील गोकसावंगीच्या मोर्णा तलावात (Morna Lake) प्रेमीयुगलाची मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. अशातच याप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आलीय. अनेक वर्षांपासून एकमेकाच्या प्रेमात असून घरच्यांचा लग्नाला विरोध असल्यामुळं दोघांनीही तलावात उडी (Washim Crime News)घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध केल्याने या प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी (Crime News) मारुन प्रेमीयुगलानं आयुष्य संपवलंय. (Washim Crime News) 

Washim Crime: आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, एकत्रच उडी मारुन प्रेमीयुगलानं आयुष्य संपवलं

मिळालेल्या माहितीनुसार, दोघे मृतक गोकसावंगी गावातील रहिवाशी असून 24 वर्षीय युवक महादेव गजानन निंबाळकर आणि 19 वर्षीय निकीता संतोष कांबळे ही युवती 14 ऑगस्ट पासून बेपत्ता होते. याप्रकरणी त्यांच्या पालकांनी मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रारही दिली होती. मात्र, काल (18 ऑगस्ट) या दोघांचेही मृतदेह गावाजवळच असलेल्या मोर्णा तलावात आढळून आले होते.

Washim Crime: घरच्यांना अनेक वेळा समजून सांगितलं, सगळे पर्याय संपताच प्रेमी जोडपं तलावावर गेलं अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांचे प्रेम संबंध होते आणि लग्न करण्यासंदर्भात त्यांनी घरच्यांना माहिती दिली होती. मात्र, दोघही वेगवेगळ्या जातीतील असल्यानं त्यांच्या घरच्यांचा या आंतरजातीय विवाहाला विरोध होता. घरच्यांना अनेक वेळा समजून सांगूनही ते लग्नाला तयार होत नसल्यानं नैराशेत गेलेल्या दोघांनीही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि तलावात उडी घेतली. अशातच मासेमारी करण्यासाठी काही जण तलाव परिसरात गेले असताना त्यांना दोन्ही मृतदेह तलावाच्या काठावर एकाच ठिकाणी आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह तलावच्या बाहेर काढून शव विच्छेदणासाठी पाठवलेत आणि पुढील तपास सुरु केलाय. मात्र, समाजातील खोट्या प्रतिष्ठेच्या भीतीनं दोघांनी आपला जीव गमावला. असल्याची माहिती देण्यात आलीय.

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.