'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
भाग्यश्री कांबळे August 19, 2026 04:13 PM

Awarapan 2 Box Office: प्रदर्शनापूर्वी 'आवारापन 2' (Awarapan 2) हा सिनेमा सुपरहिट ठरेल, निर्मात्यांसाठी जॅकपॉट (Box Office Collection) ठरेल, हे कुणालाच अपेक्षित नव्हतं.  इम्रान हाश्मीचा खरंतर या सिनेमातून मोठा कमबॅक झालाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.  पहिल्या आठवड्यातच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. सनी देओलच्या 'बंटवारा 1947' (Batwara 1947) या सिनेमाला 'आवारापन 2'  या चित्रपटाने पछाडलं आहे. आतापर्यंत या सिनेमाला प्रेक्षकवर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्यानंतर सोमवारी या सिनेमाच्या कमाईत लक्षणीय घट झाली (Entertainment)  असल्याचं पाहायला मिळालं. परंतु, तरीही 'आवारापन 2'  या चित्रपटाने कोटींच्या घरात कमाई केली आहे. 

'आवारापन 2' या सिनेमानं अवघ्या पाच दिवसांत 100 कोटीं रुपयांचं कलेक्शन केलं (Awarapan 2 Box Office Emraan Hashmis Film Crosses Rs 100 Crore)

चार दिवसांतच  'आवारापन 2'  हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर  वर्चस्व गाजवत असल्याचं पाहायला मिळत आहे.  सनी देओलच्या 'बंटवारा 1947' सोबत टक्कर असूनही हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये   लोकप्रिय ठरला आहे.  विशेष म्हणजे, प्रदर्शनाच्या तीन दिवसांतच या सिनेमाने आपल्या खर्चाच्या दुप्पट कमाई केली आहे.   याचाच अर्थ असा की, हा सिनेमा मोठा नफा कमवत आहे. पहिल्या सोमवारी या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं.  दरम्यान, मंगळवारी म्हणजेच  पाचव्या दिवशी 'आवारापन 2'  या सिनेमाने आपला पुन्हा वेग पकडला आहे.   'आवारापन 2'  हा सिनेमा 15 ऑगस्ट रोजी रिलीज झाला होता. मंगळवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी या सिनेमाने किती कोटींचं कलेक्शन केलं? जाणून घेऊयात.

'आवारापन 2'  या सिनेमाच्या कलेक्शनबाबत बोलायचं झाल्यास , प्रदर्शनाच्या पहिल्या पाच दिवसांत या सिनेमाने  बॉक्स ऑफिसवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या सिनेमाने अवघ्या पाच दिवसांत 100 कोटींच्या कल्बमध्ये प्रवेश केला आहे. 100 कोटींच्या कल्बमध्ये प्रवेश करणारा हा सिनेमा या वर्षातील  सातवा चित्रपट ठरला आहे. आता 'आवारापन 2'  या सिनेमाचे लक्ष्य 'कॉकटेल 2'च्या 104.53 कोटी रुपयांच्या लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकण्याचे आहे. 'आवारापन 2'  या सिनेमाने पाचव्या दिवशी इतिहास रचला आहे.

सिनेमाच्या कलेक्शनबाबत बोलायचं झाल्यास, या सिनेमाने पहिल्या दिवशी 22 कोटींचं कलेक्शन केलं आहे.   दुसऱ्या दिवशी 33.75 कोटी कमावले आहेत.  तिसऱ्या दिवशी या सिनेमाने  26 कोटींचा बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवला आहे.   तर, चौथ्या दिवशी या सिनेमाने  9.25 कोटींचे कलेक्शन केले आहे. सोमवारी या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी या सिनेमाने 9.50 कोटी रुपयांची बॉक्स ऑफिस कमाई केली आहे. त्यामुळे या सिनेमाने एकूण 5 दिवसांत  100.50 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केलं आहे.  'आवारापन 2'  हा सिनेमा 'आवारापन' या सिनेमाचा सिक्वेल आहे.  नितिन कक्कर दिग्दर्शित या सिनेमात  दिशा पटानी आणि पूरण गब्बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.