Actor Kartik Aaryan: लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. कार्तिक आर्यन त्याच्या आगामी सिनेमाच्या (Film Shooting) चित्रिकरणादरम्यान, जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक कबीर खान (Kabir Khan) यांच्या अनटाइटल्ड फिल्मच्या अॅक्शन सीनदरम्यान, दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्याच्या गुडघ्याला (Knee Injury) गंभीर दुखापत झाली असून, ही घटना चित्रिकरणाच्या शेवटच्या दोन दिवसांत घडली असल्याचं सांगण्यात येत आहे. कार्तिक आर्यनच्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीची माहिती समोर येताच, त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत आहेत.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार,गुडघ्याला दुखापत झाल्यानंतर कार्तिकला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जिथे डॉक्टरांनी त्याच्या गुडघ्याची सर्जरी करुन आराम करण्याचा सल्ला दिला. सध्या त्याला रेस्ट घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कबीर खान दिग्दर्शित या सिनेमात अनेक थरारक अॅक्शन सीन्स आहेत. यासाठी कार्तिक आर्यन खास गेल्या काही काळापासून विशेष ट्रेनिंग घेत आहे. पण त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे अभिनेत्याला सध्या आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
प्रॉडक्शनच्या संबंधित एका सुत्राने सांगितलं की, 'कार्तिक फोर्टिस रहेजा रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार घेत आहे. लवकरच त्याच्या गुडघ्याची सर्जरी होणार आहे. सर्जरी झाल्यानंतर काही दिवसांसाठी त्याला आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. यानंतर कार्तिक आर्यन आपल्या कामावर रुजू होईल', असं त्यांनी म्हटलं आहे. कबीर खानसोबत कार्तिक आर्यनची ही दुसरी फिल्म आहे. या सिनेमाचं शीर्षक अद्याप ठरलेलं नसून, लवकरच यावर काम करण्या येणार आहे. यापूर्वी कबीर खान आणि कार्तिक आर्यनने एकत्र 'चंदू चँपियन' या सिनेमासाठी एकत्र काम केलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्जरीच्या रिकव्हरीनंतर कार्तिक आर्यन दिग्दर्शक अनुराग बसूच्या सिनेमासाठी काम करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही एक रोमँटिक म्यूझिकल फिल्म असणार आहे. या सिनेमात कार्तिक आर्यनसोबत श्रीलीला लीडरोलमध्ये काम करणार आहे. दोघांची जोडी पहिल्यांदाज एकत्र दिसणार आहे. श्रीलीलाने या प्रोजेक्टसाठी सुरुवात केली असून, मुंबईतील काही ठिकाणी या सिनेमाचं शूटिंग पार पडलं आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचं म्यूझिक प्रीतम यांचं आहे. या व्यतिरिक्त कार्तिक आर्यन 'नागजिला'मध्येही दिसणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: