पॉपकॉर्नला केवळ एक जंक फूड समजू नका, त्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित
admin August 20, 2026 01:33 AM
[ad_1]

पॉपकॉर्न म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर चित्रपटगृह, टीव्हीसमोरचा निवांत वेळ आणि कुरकुरीत स्नॅक येतो. तयार करायला सोपा आणि चवीला आवडणारा पॉपकॉर्न लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांचा आवडता आहे. मक्यापासून तयार होणाऱ्या पॉपकॉर्नमध्ये फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि काही अँटीऑक्सिडंट्स यांसारखी पोषक तत्त्वे आढळतात. त्यामुळे योग्य पद्धतीने तयार केलेला पॉपकॉर्न हा आहारातील एक चांगला स्नॅक ठरू शकतो. मात्र पॉपकॉर्न किती आरोग्यदायी आहे हे तो कशा पद्धतीने बनवला जातो यावर अवलंबून असते.

साधे किंवा एअर-पॉप केलेले पॉपकॉर्न अधिक पसंत केले जाते, कारण त्यात अतिरिक्त लोणी, मीठ किंवा साखर नसते. बाजारात किंवा चित्रपटगृहांमध्ये मिळणाऱ्या, जास्त लोणी आणि मीठ असलेल्या पॉपकॉर्नचे सेवन प्रमाणात करणे उत्तम असते. त्यामुळे पॉपकॉर्न खरेदी करताना किंवा तयार करताना त्यातील घटक आणि पौष्टिक मूल्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला तुमच्या आहारात एक आरोग्यदायी नाश्ता म्हणून पॉपकॉर्नचा समावेश करायचा असेल, तर ते योग्य प्रकारे खाणे अत्यंत आवश्यक आहे. चला पॉपकॉर्नचे फायदे आणि ते तयार करताना कोणती खबरदारी घ्यावी, हे जाणून घेऊयात.

पॉपकॉर्न खाल्ल्याने शरीराला मिळू शकतात हे फायदे

1. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते पॉपकॉर्न फायबरचा एक चांगला स्रोत आहे. हे फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि आतड्यांसाठीही चांगले मानले जाते. आपल्या आहारात फायबरचा समावेश केल्याने आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत होऊ शकते.

2. पॉपकॉर्नमधील फायबर हळूहळू पचते त्यामुळे खाल्ल्यानंतर जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे खाण्याची इच्छा कमी होते आणि हा एक उत्तम नाश्ता ठरतो.

3. पॉपकॉर्न संपूर्ण धान्यांपासून बनवले जाते आणि त्यात फायबर असते. फायबर खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढण्यास प्रतिबंध करू शकते. मात्र त्यात जास्त साखर किंवा गोड चव मिक्स करू नये.

4. पॉपकॉर्नमधील फायबर शरीरातील काही कोलेस्ट्रॉल बाहेर टाकण्यास मदत करू शकते. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी निरोगी राखण्यास मदत होते. मात्र, पॉपकॉर्नमध्ये जास्त लोणी आणि मीठ टाकल्याने तो एक आरोग्यदायी नाश्ता बनत नाही.

5. पॉपकॉर्नमध्ये फेरुलिक ॲसिडसारखे अँटिऑक्सिडंट्स असतात. हे शरीराला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवण्यास मदत करू शकतात. तथापि पॉपकॉर्नचे फायदे मोठ्या प्रमाणावर ते बनवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतात.

पॉपकॉर्न बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा

पॉपकॉर्न आरोग्यदायी ठेवण्यासाठी कमी तेल, कमी मीठ आणि जास्त लोण्याचा वापर करू नका. जास्त लोणी, मीठ, साखर मिक्स केल्याने कॅलरीज आणि फॅट वाढू शकते. दुकानांमध्ये किंवा चित्रपटगृहांमध्ये मिळणाऱ्या पॉपकॉर्नमध्येही अतिरिक्त मीठ, फॅट्स आणि इतर घटक असू शकतात.

साधे पॉपकॉर्न तुम्ही सहज घरी बनवू शकता. थोडे तेल टाकून पॅनमध्ये किंवा एअर पॉपिंग पद्धतीने बनवता येते. तुमच्याकडे मीठ नसले तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले यात मिक्स करू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

—————————————————————————————————————-
—————————————————————————————————————-
—————————————————————————————————————-


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.