नथिंगचा 50 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला हा फोनवर मोठी सूट, जाणून घ्या या विशेष ऑफरबद्दल…
admin August 20, 2026 01:33 AM
[ad_1]

तुम्ही जर Nothing स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कंपनीच्या मिड-रेंज किंमतीत उपलब्ध असलेल्या फोनवरील ही ऑफर तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या वर्षी मार्चमध्ये लाँच झालेला Nothing Phone 4a आता रिलायन्स डिजिटलद्वारे एका बँक ऑफरसह कमी किमतीत उपलब्ध करण्यात आलेला आहे. तुम्ही जेव्हा हा फोन खरेदी कराल तेव्हा HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला सूट दिली जात आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण नथिंग फोन 4a फोनच्या सवलतीबद्दल जाणून घेऊयात.

नथिंग फोन 4a सवलत उपलब्ध

नथिंग फोन 4a चा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट रिलायन्स डिजिटलवर 34 हजार 999 रूपयांना सूचीबद्ध केला आहे. तर हा फोन तुम्ही खरेदी केल्यावर याचे HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 2 हजार 624 रूपयांची सूट मिळू शकते. बँकेच्या ऑफरचा लाभ घेतल्यानंतर, फोनची प्रभावी किंमत 32 हजार 374 रूपये होते. म्हणजेच सूचीबद्ध किमतीच्या तुलनेत 2 हजार 624 रूपयांची बचत होते.

नथिंग फोन 4a फोनचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन

नथिंग फोन 4a मध्ये 1224×2720 पिक्सेल रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 4,500 nits पीक ब्राइटनेस असलेला 6.78-इंचाचा LTPS फ्लेक्सिबल AMOLED डिस्प्ले आहे.

तसेच फोनच्या मागील कॅमेऱ्यामध्ये f/1.88 अपर्चर असलेला 50MP प्रायमरी कॅमेरा, एक 50MP पेरिस्कोप कॅमेरा आणि एक 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

नथिंग फोन 4a फोनची बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर

हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित ओएस 4.1 वर चालतो. यात ऑक्टा-कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7एस जेन 4 प्रोसेसर आहे. यात 5400mAh क्षमतेची बॅटरी असून 50W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट आहे.

कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 4जी, 5जी, वाय-फाय, ब्लूटूथ, एनएफसी, जीपीएस आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट यांचा समावेश आहे.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.