Ashok Saraf : मला संघर्ष फार कमी करावा लागला. मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं. काय करायचं आणि कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे असे मत ज्येष्ठ अभिनेते आणि पद्मश्री अशोक सराफ (Ashok Saraf ) यांनी व्यक्त केले. विनोदात जास्त पसरलं नाही पाहिजे असेही सराफ म्हणाले. वयाच्या सातव्या वर्षी मला पहिला ब्रेक मिळाला. एकांकिका सादर केली त्यामध्ये बेस्ट अँक्टर पुरस्कार मिळाल्याचे ते म्हणाले. मग बाकीच्यांनी शिक्षण घेतलं आणि मी हेच शिकत राहिल्याचे सराफ म्हणाले.
नागपूरमध्ये यायला मला फार आवडतं. मी फार कमी आलो असलो तरी नागपूर यायचं म्हणजे माझं होकार असणार असे अशोक सराफ म्हणाले. लहानपणापासून सगळे उद्योग केले तरचं मोठेपणी काहीतरी करू शकतो. मुलांचे पाय पाळण्यात दिसते यालाच म्हणतात. माझे पाळण्याबाहेर निघाले होते. लहानपणी बाबाचा फार मार खाल्ल्याचे सराफ म्हणाले. वयाच्या सहाव्या वर्षापासून मी तबला वाजवतो. मला कोणी शिकवल नाही. हे सर्व दैवी आहे. मला कोणतीही गोष्ट रिदम मध्ये गेली ती आवडते आणि त्याला लोक डोक्यावर घेतात.
1970 साली स्लॅपस्टिक कॉमेडी सादर केलेला त्यावेळी पहिला प्रकार. मला अशोक सराफ व्हायचं असे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सुधीर जोशीकडे बोलून दाखवले आणि त्याचा पाठपुरावा करून त्यांनी साध्य केलं. वाचनापेक्षा बघण्यातून आपल्याला अधिक शिकता येतं असा माझा अनुभव असल्याचे अशोक सराफ म्हणाले. मी लहानपणापासून नाटकात रांगलो. माझ्या मामाची कलाभूमी होती. माझ्या मामाकडून मी टायमिंग शिकलो. त्याचा मला अधिक फायदा झाला.
अभिनय क्षेत्रात बघणे आवश्यक, वाचनातून भाषा सुधारू शकता असेही ते म्हणाले. माझ्याआधी देखील चांगले कॉमेडियन होते. त्याचा एक जमाना होता . मराठी चित्रपट सृष्टी यांच्याविना मान्य व्हायची नाही. सहज अभिनय करणे. वाक्य कसे टाकून प्रेषक आपल्याकडे करायचं हे त्यांना माहित असायचं. मराठी चित्रपटाचा एक काळ होता तो राजा गोस्वामी वीणा बनायचं नाही असेही ते म्हणाले.
मला मिळालेलं यश तीन तासात मिळालं. पांडू हवालदार चित्रपट पहिला तर लोकांनी मला बाहेर पडू दिलं नाही.गर्दी पाहून ग्राउंड पार करणे मुश्किल. त्यात एकाने माझा पॉकेट मारला. मी रिक्षात बसलो तेव्हा लोक टॉवर वर बसून पाहत होते. तेव्हापासून लोकांना डोक्यावर घेऊन राहायची ही सवय सुरू झाल्याचे सराफ म्हणाले. गोंधळात गोंधळ चित्रपटात मी ऍक्शन कॉमेडी समाविष्ट केली. आता तो इतका वाढलाय की सांगता येत नाही.
सचिन पिळगावकरबाबत बोलाताना सराफ म्हणाले की त्याला पाहिजे ते मी करतो. किंवा मी करतो त्याला समजत होतं. हे एकमेकाला समजत गेले. लक्ष्मीकांत बेर्डे आणि मी 50 चित्रपट केली. याला टायमिंग जुळल होतं. म्हणून लोकांनी डोक्यावर घेतल्याचे सराफ म्हणाले. त्यावेळी पासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली. आमच्याआधी पण सुपरस्टार होते. मात्र त्याकाळात सुपरस्टार म्हणत नव्हते. महेश कोठारे क्राइम आणि अद्भुत कोठ्या महाकाल असे असायचे. सचिनकडे कौटुंबिक असायचे. धूमधडाका चित्रपट 50 आठवडे चालल्याचे सराफ म्हणाले.
कोल्हापुरात सिनेमाचं वारं वेगळं असायचं. एकावेळी दहा चित्रपटाच शूट व्हायचे. मी एकाच वेळी तीन चित्रपटाचे शूट करायचो. त्यावेळी लेखक देखील चांगले होते. घटना आणि त्याला अनुसरून डायलॉग असायला हवं तेव्हा सर्व हिट होते. चित्रपटात कितीही सजावट करा, लंडन आणि अमेरिकेत शुटिंग करा. त्यामध्ये कथा महत्वाची असते. कुठे गेले यापेक्षा काय केले हे महत्वाचे असल्याचे सराफ म्हणाले.
दादा कोंडके इतका उत्स्फूर्त माणूस मी बघितला नाही. जशी परिस्थिती तसे विनोद ते करायचे म्हणून लोकांना ते आवडायचे. मी त्यांच्या सोबत तीन चित्रपट केले. तिन्ही चित्रपट गोल्डन जुबली ठरले. नंतर ते डबल मिनिंगकडे गेले. तो देखील विनोद आहे. लोकांना हसवतो. मात्र लोकांना जास्त वेळ हसवू शकत नाही असे सराफ म्हणाले. तुम्हाला यश मिळालं असेल तर सर्व काही झाकलं जातं असेही ते म्हणाले.
नाटक हा मुळात जीव की प्राण आहे. बेस आमचा नाटक नंतर चित्रपट कसा करायच हे ठरवायचं. चित्रपटात एकदा सीन केला तर संपल. मात्र नाटकात दरवेळी प्रयोग होतो. त्यामध्ये तुम्ही डेव्हलप होता. 12 वर्ष चित्रपट केल्यावर 400 ते 500 प्रयोग नाटक केल्याचे सराफ म्हणाले. भस्म नावाचं एक पुस्तक आहे. हा चित्रपट मसनजोगी अशा एका माणसावर होती. माणसाने समाजातून बाहेर टाकल्यावर त्यांच्या मुलांचं काय होत असेल याला कल्पना करत होतो.
मी राजकारणी नाही. त्यातील काही कळत नाही. त्यात भूमिका अशी लिहिली गेली आणि मला त्याच बेस्ट अवॉर्ड मिळाल्याचे सराफ म्हणाले. आपली माणसं चित्रपट त्यावेळी तो हिट होता. त्यामध्ये मला पुरस्कार मिळाला. एका कुटुंबाची कहाणी त्या चित्रपटात मांडली गेल्याचे सराफ म्हणाले.
घरच्या व्यक्तीला आपला माणूस काय माहित असेल तर मग काही होत नाही. दोन्ही एकाच क्षेत्रातील लोक असेल तर एकमेकांना कळतं. त्याबाबतीत मी भाग्यवान .त्याचं जरा जास्तीच बारकाईने लक्ष असते. तुम्ही वाट्टेल ते ऐकवा. मी सांगतो काय ते असे सराफ म्हणाले. एखादा चित्रपट यशस्वी नाही झाला मात्र तुम्ही किती मनापासून किती काम केलं यावरून तुम्हाला चित्रपटाच्या यश आणि अपयशाचा मनाला वाटतं. यामध्ये आपण काहीच करू शकत नाही. प्रेषकांना काय आवडतं हे महत्त्वाचं असे सराफ म्हणाले.
मला आता नाव आठवत नाही. किस्से काय आठवतील. सुरांच्या बाबतीत सूर या गल्लीतून गेला तर मी दुसऱ्या गल्लीतून जातो. हे गायकांच गाणं नाही तर नटाचं गाणं आहे, असं सांगितलं. मी गायलो आणि एका गायकांचा जन्म झाला. जास्त काळ टिकला नाही ती वेगळी गोष्ट असे सराफ म्हणाले.
प्रवास थोडक्यात सांगणारा आहे का? 37 वर्ष झाली आता. चांगला संसार चालला वाईट नाही. मी काय माणूस हे त्यांनी ओळखून घेतलं. मी त्याचे चित्रपट पाहून कौतुक करतो. कारण रात्रीच्या जेवणाचा प्रश्न असतो. मी कौतुक करतो कारण तिला माझ्याकडून अनेक काम करून घ्यायची असतात. मला संसाराची ABC कळत नाही. तिच्यामुळे संसार चालला. एवढी मोठी अभिनेत्री असताना ती पहिली बायको याची तिला जाण आहे. स्वतः बॅकफूट जाऊन मला सांभाळल्याचे सराफ म्हणाले.
तशा सर्व भूमिका अवघड. पात्र प्रत्यक्षात उतरविणे फार कठीण असते. तुम्ही चांगल्या रीतीने केल्यावर कठीण वाटत नाही. मात्र त्याआधी ती कठीण असते. मी नाटक आणि प्रयोग इतकी केली तरीही प्रयोगात एन्ट्री घेताना थोडा धास्तावलेल असतो. माझ्या लहानपणी स्टेजवर प्रत्येक कॉमेडी नाटक पहिली. त्यावेळी प्रत्येक गोष्ट नवीन वाटायची असेही सराफ म्हणाले. मी एखादी भूमिका केल्यावर तेवढीच चांगली करू शकेल असे होऊ शकत नाही. आता अधिक चांगली किंवा वाईट होऊ शकते. हे फार विचारवंतांचे वाक्य आहे. आजची पिढी कोणाचं ऐकत नाही. ऐकत नाही याला त्यांची ही काही कारण असू शकतात. त्यामुळं काही सांगू नये, प्रत्येक माणसाला स्वतंत्र अधिकार आहे असे सराफ म्हणाले.