महापालिका मुख्यालयामधील बंद उपहारगृह उद्यापासून सुरू होणार आहे. एफडीएकडून कमल कॅटरर्सला उपहारगृह सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. महिनाभरानंतर उपहारगृह सुरू होणार आहे. ताकामध्ये माशी आणि कांदा भजीमध्ये प्लास्टिकचा तुकडा आढळल्यानं कारवाई झाली होती. अस्वच्छतेमुळे 20 जुलैला परवाना निलंबित करण्यात आला होता. एफडीएच्या सूचनांचं पालन केल्यानंतर पुन्हा हे उपहारगृह सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेत. सर्व त्रुटींची पूर्तता आणि सुनावणी पूर्ण झाल्यानंतर उपहारगृह सुरू करण्याची ही परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू