गडचिरोलीच्या भामरागडला पुन्हा पुराचा विळखा; पर्लकोटा नदीला पूर, 50हुन अधिक गावांचा संपर्क तुटला, तर मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका पुरात अडकली
मंगेश भांडेकर August 24, 2026 05:43 PM

Gadchiroli Flood News गडचिरोली  : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत आहे. अशातच गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी कुठे मुसळधार (Gadchiroli Rain) तर कुठे रिपरिप पाऊस सुरू आहे. अशातच काल (23 ऑगस्ट) भामरागड (Bhamragad) तालुक्यात 61 मिलिमीटर तर भामरागड मंडळात 73 मिलिमीटर पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे भामरागड लगतच्या परलोकोटा नदीला (Parlakota River) पूर आला आहे. परिणामी या नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे भामरागडसह पलीकडील 50 हून अधिक गावांचा संपर्क सध्या तुटलेला आहे. पुराचा धोका पाहता तालुका प्रशासनाने सत्कतेचा इशारा दिला असून खबरदारी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Gadchiroli Flood News)

Gadchiroli Flood News : गडचिरोलीत पुराचा तडाखा; मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका पुरात अडकली

गडचिरोलीत मुसळधार पावसाचा कहर पुन्हा पाहायला मिळतोय. दक्षिण गडचिरोलीतील नदी-नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच या पूरस्थितीचा धक्कादायक फटका मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेलाही बसलाय. जिमलगट्टा येथील 65 वर्षीय मलय्या पन्हटीवार यांचा हेडरी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्यांचा मृतदेह घेऊन जात असताना आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नंदीगाव नाल्याचा पूल पुराच्या पाण्याखाली गेला. पाणी वाढल्याने रुग्णवाहिका रस्त्यातच अडकली असून, दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे.

Gadchiroli News : गडचिरोलीतील नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ, पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली

तर दुसरीकडे भामरागड तालुक्यातही पूरस्थिती गंभीर झाली आहे. पर्लकोटा, पामुलगौतम आणि इंद्रावती नद्यांना पूर आला असून, पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने यावर्षी दुसऱ्यांदा भामरागडचा पुन्हा संपर्क तुटला आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिण गडचिरोलीतील नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि पुराच्या पाण्यातून प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Gondia Bridge News : गोंदियात तिगाव-जांभुरटोला रस्त्यावरील पूल अत्यंत जीर्ण आणि धोकादायक

गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील तिगाव-जांभुरटोला रस्त्यावरील छोटा पूल अत्यंत जीर्ण आणि धोकादायक झाला आहे. पुलावर दोन मोठे खड्डे पडले असून, पुलाचा मोठा भाग खचल्याने लोखंडी सळ्या उघड्या पडल्या यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक, विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी धोक्याचे झाले आहे. जर पुलाची वेळेवर दुरुस्ती झाली नाही, तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.