मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात संपन्न झाली. विशेष म्हणजे, आजच्या बैठकीतूनच शेतकरी (Farmer) कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्याहस्ते शेतकऱ्यांना ही गुडन्यूज देण्यात आली असून राज्यातील 6 लाख 36 हजार 036 शेतकऱ्यांच्या खात्यात 5086 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. यासह, राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय घेतले असून क्रीडा (Sports) क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्यांना भेट देण्यात आली आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरी खेळाडूंच्या बक्षिस धोरणात सुधारणा करण्यात आली आहे. यासह, नागपूर, नाशिक आणि जत शहरांमधील विविध संदर्भाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय घेतले असून क्रीडा विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महसूल व वन विभाग आणि विधि व न्याय विभागाच्या अंतर्गत हे चार निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार, अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेला प्रशासकीय इमारत उभारणीसाठी जागा देण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना दिल्या जाणाऱ्या रोख बक्षिस धोरणात सुधारणा ( क्रीडा विभाग)
नागपूर येथे लता मंगशेकर विद्यापीठ स्थापन होणार. तसेच अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ . या खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रम सुरु होणार. (उच्च व तंत्रशिक्षण विभाग)
जत नगरपरिषदेला प्रशासकीय इमारत उभारणीसाठी मौजे जत (जि. सांगली) येथील २ हजार ५८५ चौ. मीटर शासकीय जमीन देण्यास मान्यता ( महसूल व वन विभाग)
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय होणार. त्यासाठीची पदे व अनुषांगिक खर्चाच्या तरतुदीस मान्यता. (विधि व न्याय)
मोठी बातमी, शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, 6,36,036 शेतकऱ्यांना 5086 कोटी रुपये वितरित