Govinda and Sunita Ahuja Instagram: अभिनेता गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja) सध्या दोघेही वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत बऱ्याच गोष्टी सोशल मीडियात व्हायरल (Social Media) होत आहे. त्यांना आपल्या वैवाहिक आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं म्हटलं जात आहे. अलिकडेच गोविंदाने सार्वजनिक नोटीस जारी केली असल्याची माहिती आहे. नुकतंच दोघांनीही एकमेकांना अनफॉलो (Entertainment) केली असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर दोघांनीही एकमेकांना पुन्हा फॉलो केली असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांच्याही इन्स्टाग्राम अकाऊंटच्या फॉलोइंग लिस्टमध्ये एकमेकांना फॉलो करत असल्याचं दिसत आहे.
गोविंदा आणि सुनीता दोघांमध्ये बऱ्याच काळापासून मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यादरम्यान, सुनीताने अलिकडेच घटस्फोटाची केस मागे घेतली आहे. सुनीताने दाखल केलेली घटस्फोटाची केस मागे घेण्यामागचं कारणही सांगितलं. सुनीताने राखी सावंतसोबत बोलताना, 'गोविंदा दुसरं लग्न करण्यासाठी प्लानिंग करत होता', असं तिने सांगितलं. या कारणास्तव सुनीताने घटस्फोटाची केस मागे घेतली. राखी सावंतचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
सध्या गोविंदाचं नाव कोमल राणी स्वर्णकारसोबत जोडलं जात आहे. कोमल राणी या सिनेमाद्वारे डेब्यू करणार आहे. गोविंदा स्वत: कोमल राणीला लाँच करणार आहे. गोविंदा लवकरच 'रुपा' या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाद्वारे गोविंदा साधारण 7 वर्षांनंतर कमबॅक करणार आहे. गोविंदा आणि कोमल राणी या सिनेमात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. गोविंदाने फिल्मची अनाउंसमेंट केली होती. तसेच प्रेस कॉन्फ्रेंसद्वारे राणीला इंट्रोड्यूस केलं होतं. यानंतर दोघांनाही दोनवेळा एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं.
गोविंदा आणि कोमलचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर सुनीताने व्हायरल व्हिडीओवर पापाराझींसमोर कमेंट केली होती. गोविंदाला 'शुगर डॅडी' असं म्हटलं होतं. यानंतर गोविंदाचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओतून त्याने सुनीताला प्रत्युत्तर दिलं असल्याचं म्हटलं जात होतं. व्हिडीओतून गोविंदाने सुनीताला मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला. मामा- मामीच्या भांडणावर कृष्णा अभिषेकनेही प्रतिक्रिया दिली. 'घरगुती गोष्टी कुटुंबातच राहिल्या पाहिजेत. इतर लोक यावर बोलत आहेत, मला आवडत नाही', असं त्याने म्हटलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'दृश्यम 3' चित्रपट कधी रिलीज होणार? अक्षय खन्नाच्या जागी कोणता कलाकार झळकणार? पोस्टरने गूढ वाढवलं