मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
सत्यम सिंह August 24, 2026 11:13 PM

मुंबई : दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या सभांनी महाराष्ट्रभर गाजलेल्या मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्क मैदानाची वेगळीच ओळक आहे. या मैदानावर दररोज हजारो नागरिक, लहान मुले खेळासाठी येतात. स्व. बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक असल्याने शिवसैनिक देखील आदरांजली वाहण्यास येत असतात. आता, शिवाजी पार्क मैदान परिसरातील नामवंत Cafe Cadell चा अन्न परवाना महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) निलंबित केला आहे. 20 ऑगस्ट 2026 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी श. स. पाटील यांनी केलेल्या तपासणीत येथील कॅफेत अन्नसुरक्षा व स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. आस्थापनात अपुरी ventilation व्यवस्था, अस्वच्छ व अन्नसुरक्षेसाठी अयोग्य फरशी, अपुऱ्या हात धुण्याच्या आणि हायजिन सुविधा आढळल्या. 

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्रात ठिकठिकाणी एफडीएकडून धडक कारवाई सुरु आहे. विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही एफडीएच्या कारवाईचं कौतुक केलं. भेसळयुक्त पदार्थांमुळे एखाद्याच्या जीवाला धोका असतो. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता होती आणि ही कारवाई सध्या सुरु आहे, याचा मला आनंद आहे, असे मुख्यमंत्र्‍यांनी म्हटलं. त्यानुसार, आणखी कारवाया सुरू असल्याचं दिसून येतं.

मुंबईतील अन्न सुरक्षा अधिकारी श. स. पाटील यांनी शिवाजी पार्क परिसरातील कॅफे कॅडेलामध्ये केलेल्या तपासणीत येथील कॅफेत अन्नसुरक्षा व स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. आस्थापनात अपुरी ventilation व्यवस्था, अस्वच्छ व अन्नसुरक्षेसाठी अयोग्य फरशी, अपुऱ्या हात धुण्याच्या आणि हायजिन सुविधा आढळल्या. शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचे योग्य वेगळेणपण होत नसल्याने परस्पर दूषितीकरणचा धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. उपकरणे व कटलरीचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता वेळापत्रक आणि आवश्यक नोंदी समाधानकारक नसल्याचेही आढळले. तसेच सुरक्षित पाण्याच्या तपासणी नोंदी उपलब्ध नव्हत्या. या त्रुटींमुळे कॅफे कॅडेलाचा FSSAI परवाना क्रमांक 11524004000070 निलंबित करण्यात आला आहे. 

बोगस FDA अधिकाऱ्यास अटक

पालघरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचं सांगत भर रस्त्यात दोन मद्यपींकडून हॉटेल चालकाला दमदाटी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पालघरमधील लक्ष देशी दारू समोर ही घटना घडली असून पार्सलचे पैसे देण्यास देखील नकार मद्यपींनी दिला होता. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची आपण माणसं असल्याचं सांगत या दोघांनी हॉटेल मालकास दादागिरी कली. याप्रकरणी, दोन्ही मद्यपी तरुणांवर पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल भोईर आणि जयेश भोईर असं दोघांचे नाव आहे. दरम्यान, दोघांनाही ओळखपत्र विचारल्यावर पळून जाण्याचा प्रयत्न त्यांनी केली, त्यानंतर त्यामुळे त्यांचा भांडोफोड झाला. 

सीजेपीची पुन्हा दिल्लीत धडक, शिक्षक दिनीच इंडिया गेटपासून मोर्चा; अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.