'आवारापन 2'चा बॉक्स ऑफिसवर जलवा कायम, 'वेलकम टू द जंगल'च्या कमाईला पछाडलं; 11 दिवसांत 5व्या क्रमांकावर जागा बनवली
भाग्यश्री कांबळे August 25, 2026 01:13 PM

Awarapan 2 Box Office Day 11: इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) स्टारर आणि नितिन कक्कर (Nitin kakkad) दिग्दर्शित 'आवारापन 2' या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे.  हा सिनेमा इम्रान हाश्मीच्या  फॅन्स क्लबमध्ये सुपरहिट ठरला आहे.   या सिनेमाने पहिल्या आठवड्यात छप्परफाड (Entertainment) कमाई केली आहे.  तर, दुसऱ्या विकेंडमध्येही या सिनेमा जबरदस्त कमाई केली आहे.  या सिनेमाला 'सुपरडूपर' हिटचा (Box Office Collection) टॅग मिळाला आहे.  या सिनेमाने कोटींच्या घरातच कमाई केली आहे.  आता या सिनेमाने  11 व्या दिवशी किती कोटींचं कलेक्शन केलं?  एकूण 11 दिवसांत 'आवारापन 2' या सिनेमाने किती कोटींचा गल्ला जमवला? जाणून घेऊयात.

'आवारापन 2'ने दुसऱ्या सोमवारी म्हणजेच 11 व्या दिवशी किती कोटी कमावले? (Awarapan 2 Box Office Day 11 Emraan Hashmi Film)

 'आवारापन 2' या सिनेमामुळे इम्रान हाश्मीच्या कारकि‍र्दीला सुगीचे दिवस आले आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जबरदस्त गाणी आणि इम्रान हाश्मीचा अनोखा अंदाज. यामुळे हा सिनेमा प्रेक्षकवर्गामध्ये सुपरहिट ठरला आहे.  'आवारापन 2' या सिनेमामुळे इम्रान हाश्मीचा कमबॅक झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकवर्गाकडून मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे या सिनेमाच्या कमाईत प्रचंड वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.  आता दुसऱ्या सोमवारी म्हणजेच 11 व्या दिवशी 'आवारापन 2' या सिनेमाने किती कोटींचं कलेक्शन केलं? 

'आवारापन 2' या सिनेमाने पहिल्या दिवशी 22 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं.  सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार,  'आवारापन 2' या सिनेमाने प्रदर्शनाच्या 11 व्या दिवशी  म्हणजेच दुसऱ्या सोमवारी 2.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतात 'आवारापन 2' या सिनेमाने एकूण 11 दिवसांत  139  कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले असल्याची माहिती आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, 'आवारापन 2' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात  113.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केलं आहे.   चित्रपटाने प्रदर्शनाच्या 8 दिवशी  दा  5.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

प्रदर्शनाच्या 9 व्या दिवशी म्हणजेच  दुसर्‍या शनिवारी 'आवारापन 2' या सिनेमाच्या कमाईत तेजी पाहायला मिळाली.  या सिनेमाने 8.25 कोटी रुपये कमावले.  यानंतर 'आवारापन 2'   या सिनेमाच्या रविवारच्या कमाईत वाढ झाली असल्याचं पाहायला मिळालं.   दुसऱ्या रविवारी या सिनेमाने 8.75 कोटी कमावले. आता सिनेमाच्या कमाईत मंदी झाली असल्याचं पाहायला मिळत जरी असलं तरी,  कोटींच्या घरातच हा सिनेमा कमाई करत आहे.  दरम्यान, 'आवारापन 2' या सिनेमाने 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाच्या लाइफटाइम कमाईला मात दिली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

अब्जाधिश घराण्याची सून होणार अभिनेत्री कृती सेनन? महेंद्रसिंग धोनीशी खास कनेक्शन, फोटोंनी वेधलं लक्ष

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.