Home Loan : घर खरेदी करण्यासाठी पती आणि पत्नीने मिळून संयुक्त (Joint) होम लोन घेतले आणि दुर्दैवाने दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर उर्वरित कर्जाची रक्कम (Home Loan) कोण भरेल? बँक कर्ज माफ करते की दुसऱ्या पार्टनरलाच सर्व हप्ते भरावे लागतात? यासंदर्भातील कायदेशीर आणि बँकिंग नियम खालीलप्रमाणे आहेत, ते नियम सविस्तरपण जाणून घेऊयात.(Home Loan)
पती आणि पत्नी जेव्हा एकत्र मिळून होम लोन घेतात, तेव्हा दोघांवरही कर्ज फेडण्याची समान जबाबदारी असते. दुर्दैवाने दोघांपैकी कोणाचाही मृत्यू झाला, तर उर्वरित कर्जाची जबाबदारी संपत नाही. अशा परिस्थितीत हयात असलेल्या पार्टनरलाच उर्वरित सर्व EMI भरावे लागतात. बँक कर्जाची हमी (Guarantee) म्हणून घर गहाण ठेवलेले असते, त्यामुळे कर्ज न फेडल्यास बँक नियमानुसार मालमत्तेवरच दावा सांगून आपली थकबाकी वसूल करू शकते.(Home Loan)
एका पार्टनरच्या मृत्यूनंतर दुसऱ्या पार्टनरला उर्वरित कर्ज फेडावेच लागते. मात्र, हे होम लोन घेताना 'होम लोन कव्हर/सुरक्षा विमा' (Home Loan Insurance) घेतला होता की नाही, यावर बरेच काही अवलंबून असते. जर मृत व्यक्तीच्या हिशोबाच्या कर्जाचा विमा काढलेला असेल, तर विमा कंपनी उर्वरित रकमेचा तो हिस्सा भरते. यामुळे उर्वरित कुटुंबावर कर्जाचा मोठा ताण येत नाही.(Home Loan)
कर्जदाराच्या अकस्मात मृत्यूनंतर संपूर्ण कर्जाचा भार त्याच्या कुटुंबावर पडू नये, यासाठी होम लोन सुरक्षा विमा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. उदाहरणार्थ, पती-पत्नीने मिळून ५० लाख रुपयांचे जॉइंट होम लोन घेतले आणि काही वर्षांनी पतीचा मृत्यू झाला; अशा वेळी जर लोन इन्शुरन्स असेल, तर विम्याची रक्कम उर्वरित कर्ज फेडण्यासाठी वापरली जाते आणि घर वाचू शकते.
जर एका पार्टनरच्या मृत्यूनंतर उर्वरित हप्ते (EMI) नियमितपणे भरले गेले नाहीत, तर बँक घर जप्त करू शकते. होम लोनच्या करारात घर हे बँकेकडे सुरक्षेचा (Collateral) भाग म्हणून गहाण असते. त्यामुळे हप्ते थकल्यास बँक कायदेशीर प्रक्रियेचा आणि कर्ज कराराचा अवलंब करून मालमत्ता लिलावात काढून स्वतःची थकबाकी वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करू शकते.
टीप - लोन घेण्यापूर्वी किंवा गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या.