'घाशीराम कोतवाल' नाटकावरून एवढा वाद का झालेला? कोर्टाच्या निर्देशानंतर तेंडूलकरांनी घेतलेला 'तो' निर्णय; भर नाटकात पिकायचा हशा
abp majha web team August 27, 2026 04:43 PM

Ravindra Sathe On Ghashiram Kotwal Marathi Natak Controversy: भारतीय रंगभूमीवरचं अत्यंत महत्त्वाचं नाटक म्हणून 'घाशीराम कोतवाल ' (Ghashiram Kotwal) या नाटकाकडं पाहिलं जातं. विजय तेंडुलकर यांच्या घाशीराम कोतवाल या नाटकाने महाराष्ट्रात इतिहास घडवलेला. हे नृत्य संगीतमय नाटक असलं तरी त्याचा गाभा राजकीय होता. त्यामुळे या नाटकावर कायमच उलट सुलट सतत सातत्याने लिहिले गेले. या नाटकावरून अनेकदा गदारोळ झालाय. एकदा परदेशी प्रयोग करत असताना कलाकारांना विमानांपर्यंत पोहोचूच द्यायचं नाही, अशी धमकी दिली होती. यावर ज्येष्ठ गायक रवींद्र साठे यांनी  'घाशीराम कोतवाल' नाटकावरून झालेल्या वादाचा एक किस्सा सांगितला. 'माझा कट्टा' वर ते बोलत होते. 

'घाशीराम कोतवाल' नाटकावर वाद का वाढला?

गायक रवींद्र साठे म्हणाले ' घाशीराम कोतवाल नाटकावर झालेल्या वादाला कारण नसताना राजकीय स्वरूप आलं होतं. या नाटकासाठी आम्ही पहिला दौरा जेव्हा जर्मनीमध्ये केला. 1972 साली घाशीराम कोतवाल नाटक सुरू झालं. 1980साली म्हणजे जवळजवळ आठ वर्षांनी आम्ही गेलो होतो. या नाटकातील जे नाना फडणीसांचं चारित्र्य हनन आहे, हे ब्राह्मण जातीवरची टीका आहे. हे नाटक करणारे आम्ही सगळे ब्राह्मण होतो. मोहन गोखले त्यात काम करायचा. श्रीराम रानडे, डॉक्टरांचा चुलत भाऊ उदय लागू होता. मोहन आगाशे होते. आम्हा सगळ्यांना तेंडुलकरांची 'सत्ता भ्रष्ट करते. संपूर्ण सत्ता संपूर्ण भ्रष्ट करते.'ही थीम कुठेतरी पटलेली होती.  सद्दाम हुसेन आता जे नाव झालं, हे सगळे घाशीराम आहेत. या सगळ्यांचा नंतर वध झाला. आम्ही जेव्हा हॉलंडला शो केला, त्यावेळी डच भाषेमध्ये आमचा सिनॉबसिस नव्हतं, त्यामुळे नाटकाचा सगळा  सिनॉबसिस आधी सांगितला गेला. नंतर ते नाटक लोकांनी बघितलं. नंतर हॉलंडमधली काही लोक आली.  आणि म्हणाली की हे तुमचं नाटक नाहीये. हे आमचं नाटक आहे.असं का - ते म्हणले की आमच्या इथे एक इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंगचा मिनिस्टर होता, तो घाशीराम झाला होता. तो इतका ओवरपॉवर झाला होता, की त्याचा खून झाला. त्यामुळे हे तुमचं नाटक नाही हे आमचं नाटक आहे. अशा गोष्टी सगळीकडे घडत असतात.

ते पुढे म्हणाले,  "त्यामुळे तो झालेला वाद हा उगाच केलेला राजकीय बभ्रा होता. मग प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टाने सांगितलं, की तुम्ही नाना फडणीस हे केवळ नाटकातील पात्र आहे आणि याचा नाना फडणीसांच्या मुत्सद्दीपणाशी काहीही संबंध नाही असं एक अंडरटेकिंग वाचा. मग तेंडुलकरांनी असं सांगितलं, की नाटकाच्या इंटरवलमध्ये किंवा नंतर नाही वाचायचं. नाटकाच्या सुरुवातीला वाचायचं आणि मग पडदा उघडायचा. ते वाचलं जायचं. आणि ते वाचल्यानंतर त्यावर हशा यायचा, नाटक आणि इतिहासाचा काय संबंध आहे म्हणून..' असं ज्येष्ठ गायक रवींद्र साठे यांनी सांगितलं.

घाशीराम कोतवाल कोण होता?

माधवराव पेशव्यांच्या काळापर्यंत पुण्यात स्वतंत्र कोतवाल नव्हता. मग माधवरावांनी बाळाजी नारायण केतकर यांच्याकडे पुण्याच्या व्यवस्थेचे काम सोपवलं .आणि नाना फडणीस अर्थात बाळाजी जनार्दन फडणीस यांनी सांगेल ते काम करत जा असं बजावण्यात आलं. नाना फडणीसांच्या काळात कोतवालाचं प्रस्त वाढलं.  या घाशीराम कोतवालाच्या काळात अनेक व्यभिचाराची प्रकरणे वाढली. मद्यपी गर्भपात जबरदस्तीने स्त्रियांना पळवून नेणे अशी प्रकरण घडू लागली. या घाशीरामाचा बदनाम कारभार 'घाशीरामी कारभार' म्हणून ओळखला जाऊ लागला. नंतर या नाटकावरून अनेक गदारोळ झाले . ब्राह्मण समाजाची बदनामी केली जाते अशी हाकाटी पिटली गेली. पण सत्ता आणि हिंसा प्रधान विषय असणाऱ्या या नाटकात  सत्तेपोटी माणसाचं जनावर कसं होतं हा विषय नाटककार विजय तेंडुलकर यांनी हाताळला आहे.आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अधक पथनाविषयी भाष्य करणारं हे नाटक राजकीय आणि सामाजिक वेध घेणारी कथा आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.