प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी मृत्यूमुखी; विमानात अचानक स्फोट अन् नंतर कोसळलं, दोघेही बाहेर पडू शकले नाहीत
जयदीप मेढे August 27, 2026 05:43 PM

Trainer aircraft crashes in Kanpur: उत्तर प्रदेशातील कानपूर (Trainer aircraft crashes near Ganga banks) येथे एक प्रशिक्षण विमान कोसळले. या अपघातात वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी यांचा मृत्यू झाला. आज (27 ऑगस्ट) विमानाने उड्डाण केले आणि उड्डाणानंतर अवघ्या 20 मिनिटांतच, सकाळी पावणे बारा वाजता गंगा बॅरेजजवळ ते कोसळले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, विमान समुद्रसपाटीपासून अंदाजे 250 फूट उंचीवर असताना हवेत अचानक डगमगले आणि नंतर खाली कोसळले. संपूर्ण विमानाचे तुकडे तुकडे झाले आणि त्याचे भाग दूरवर विखुरले गेले. मात्र, विमानाला आग लागली नाही.

अपघाताच्या व्हिडिओमध्ये विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले दिसत आहे. एक वैमानिक कॉकपिटजवळ अडकला. दुसरा वैमानिक विमानापासून थोड्या अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात गंभीर अवस्थेत पडला. विमानातील एक आसनही तुटून पडले होते. पोलीस आणि प्रशासकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रक्ताने माखलेले पायलट सचिन भाटिया (गुजरात) आणि प्रशिक्षणार्थी अभिषेक पुजारी (कर्नाटक) यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी पोहोचलेले कानपूरचे पोलीस आयुक्त रघुबीर लाल म्हणाले, "विमानाने चकेरी येथील गर्ग एव्हिएशन ट्रेनिंग सेंटरमधून उड्डाण केले आणि 20 मिनिटांनंतर 39 किलोमीटर अंतरावर ते कोसळले. पायलटला 3 हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) माहिती देण्यात आली आहे. त्यांचे पथक आता तपास करेल."

पायलटला 3 हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव होता

कानपूरच्या आयुक्तांनी सांगितले की, पायलट सचिन भाटिया यांना 3 हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. तज्ज्ञांच्या मते, हवाई वाहतूक क्षेत्रात इतक्या जास्त तासांचा उड्डाणाचा अनुभव अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा अपघात कसा घडला याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डॉक्टरांच्या मते, उंचीवरून पडल्यामुळे दोन्ही पायलटांचा मृत्यू झाल्याचे दिसते. त्यांना अनेक जखमा झाल्या आहेत. मात्र, नेमके कारण शवविच्छेदन अहवालात उघड होईल.

इतर महत्वाच्या बातम्या

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.