'तुका' म्हणे चायनीज ऐसेची खावे..'; प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शकाची तुकाराम मुंढेंना टॅग करत पोस्ट; म्हणाले..
abp majha web team August 27, 2026 06:13 PM

Kedar Shinde on Tukaram Mundhe:  महाराष्ट्रात सध्या अन्न व औषध प्रशानाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या धाडसत्रांमुळे महाराष्ट्रभरातून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. अस्वच्छ ढाबे,हॉटेल डेअरी, टपऱ्या, फेक पनीर अशा अन्नसुरक्षेच्या अनेक ठिकाणी ते छापे टाकत आहेत. त्यामुळे आता पुढचा नंबर कोणाचा अशी चर्चा रंगताना दिसते. सर्वसामान्यांपासून मनोरंजनसृष्टीपर्यंत अनेक जण त्यांच्या कारवायांवर कमेंट करताना दिसत आहेत. अनेक जण तुकाराम मुंढे यांना टॅग करत त्यांच्या अडचणी सांगताना दिसतात. दरम्यान, मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी तुकाराम मुंढे यांना टॅग करत सोशल मीडिया पोस्ट केलीय.  या पोस्टची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा आहे. 

काय म्हणाले केदार शिंदे?

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी instagram वर एक पोस्ट करत तुकाराम मुंढे यांना टॅग केलं आहे. त्यांनी लिहिलं 'आज घरी हॉटेल मधून चायनीज मागवलं..एवढंच वाटलं 'तुका' म्हणे चायनीज ऐसेची खावे. रंग नाही हो! एकदम निरमा इफेक्ट! ' त्यांनी कॅप्शनमध्ये तुकाराम मुंढे यांना रिस्पेक्ट असं लिहिलं आहे. केदार शिंदेंच्या या पोस्टवर चाहते कमेंट करून त्यांच्या हॉटेलमधील चायनीजचे अनुभव सांगू लागले आहेत. अनेकांनी तुकाराम मुंढे यांच्या कारवायांचे कौतुक केलं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

दरम्यान मे महिन्यात महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचा पदभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला. त्यानंतर FDA च्या पथकांनी 3000 हून अधिक छापे टाकले. अनेक फूडचेन, अस्वच्छ हॉटेल्सचे लायसन्स रद्द करण्यात आलं. या कारवायांमुळे अन्नस्वच्छतेबद्दलच्या अनास्थेकडे लक्ष वेधले  गेल्या असून सर्वसामान्यांपासून कलाकारांपर्यंत अनेक जण तुकाराम मुंढे यांच्या कारवायांची दखल घेत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.