नेपाळमध्ये पुराने हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत या पुराने १६२ जणांचा बळी घेतला आहे. बुधवारी सकाळी ९.०० वाजता मोबाईलवर पुराचा अलर्ट मिळाला आणि अवघ्या पंधरा मिनिटात होत्याचे नव्हते झाले. लोकांना पळण्याची संधीही मिळाली नाही तेवढ्यात पर्वतावरुन आलेल्या अक्राळ विक्राळ पुराच्या लाटने त्यांना अक्षरश: गिळंकृत केले. नेपाळच्या रसुआ शहरातील बाजारपेठेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात लोक जीवाच्या आकांताने पुढे पळताना दिसत आहे. तर पाठून चिखलाचा लोंढा त्यांना गिळण्यास सरसावत पुढे येत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून जीवाचा अक्षरश: थरकाप उडत आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
नेपाळच्या तिबेटला लागून असलेल्या सीमेवर बुधवारी मोठा जलप्रलय आला आणि किनारी भागातील जिल्ह्यांचे मोठे नुकसान करुन गेला आहे. नेपाळ आणि तिबेटच्या सीमेजवळ ग्लेशियर ( हिमनदीचा ) एक मोठा भाग तुटला आणि तो खाली एक किमी खोल दरीत कोसळला. त्याच्या सोबत बर्फ, दगड आणि ढीगारा देखील खाली आल्याने नदीचे पात्र अचानक मोठे होऊन नदी किनारी गावांना अक्षरश: काही कळायच्या आत जलसमाधी मिळाली.
नेपाळच्या रसुआ स्टोन मार्केटचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.यात बाजारात सकाळचे नेहमीचे दैनंदिन व्यवहार सुरु असताना अचानक घबराट पसरताना दिसत आहे. अनेक लोक जीवाच्या आंकाताने पळताना दिसत आहेत. पाठून धुळीचे चिखलाच्या पाणी रोंरावत पुढे चाल करताना दिसत आहे. या पाण्याचा चिखल रस्त्यात येईल त्याला आडवे करत संपूर्ण मार्केटला गिळंकृत करताना दिसत आहे. जे लोक नशीबवान होते तेच लोक या पुराच्या लोंढ्यात वाचले असावेत अशी एकंदर परिस्थिती हा व्हिडीओ पाहून येते. हा अंगावर अक्षरश: काटा आणणारा आहे.