भारतात स्कूटर केवळ येजा करण्याचे साधन राहिलेले नाही. तर कुटुंबातील दैनंदिन गरज बनली आहे. ऑफीस जायचे असेल, मुलांना शाळेत सोडायचे असेल, बाजारात जायचे असेल वा शहरात छोट्या अंतरावर जायचे असेल तर स्कूटर चालवणे अनेकांना बाईकच्या तुलनेत सोपे वाटते. हेच कारण आहे की भारतीय बाजारात दर महिन्याला मोठ्या संख्येने स्कूटर विक्री होतात. ऑगस्ट २०२६ मध्ये एकूण रिटेल विक्री १७,१४,६१० झाली त्यात सुमारे १,८३,८०२ इलेक्ट्रीक स्कुटरचा समावेश आहे. जर अशा स्थितीत तुम्ही नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सौदा फायद्याचा की तोट्याचा?, स्कूटर विक्रीत सर्वात पुढे …
Honda Activa अनेक वर्षांपासून विक्रीत आहे पुढे, जुलै २०२६ अखेर मॉडेल प्रमाणे विक्रीत Activa स्कूटर २,०६,१७० विक्रीसह पहिला क्रमांक गाठला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत या दुचाकीची विक्री यंदा थोडी कमी आहे. होंडा एक्टीवा ही खास करुन रोजच्या वापरासाठी चांगली आहे. सोपी राईड आणि कुटुंबासाठी सुविधाजनक स्कूटर म्हणून पसंद केले जाते. घरातील प्रत्येकाला सहज चालवता येईल स्कूटर हवी असेल तर एक्टीव्हाला तुमच्या बेस्ट आहे.
TVS Jupiter या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. जुलै २०२६ मध्ये टीव्हीएस मोटर कंपनीने अधिकृत विक्री संख्या सांगितलेली नाही. परंतू काही स्रोतांनी दिलेल्या माहितीनुसार १,४८,५९५ युनिट विकले गेले आहेत. गेल्यावर्षी पेक्षा ही विक्री जास्त आहे. Jupiter आरामदायक राईड, कुटुंबाचा वापर आणि चांगली स्टोरेजसाठी पसंद केले जाते. या विक्रीतील वाढ हे सांगते की खरेदीदार Activa च्या शिवाय दुसरे ऑप्शन देखील पसंद केले जात आहे.
Suzuki Access 125 ने देखील विक्रीच्या बाबतील आपली मजबूत स्थिती कायम राखली आहे. जुलैमध्ये याचे ८२,५०५ युनिट विकले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही २१ टक्क जास्त आहे. ही स्कूटर खास करुन त्या लोकांनी पसंद असून ज्यांना 125cc सेगमेंटमध्ये चांगले प्रदशर्न आणि आराम हवा आहे. खरेदीच्या आधी या याचे फिचर्स, किंमत आणि मायलेज जरुर तपासा…
जर तुम्ही इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करु इच्छीत असाल तर TVS iQube वर देखील नजर टाकू शकतो. जुलै २०२६ मध्ये याची विक्री ५९,३८६ युनिट झाली होती. ही स्कूटर विक्रीत चौथा नंबरला आहे .हीच्या वार्षिक विक्रीत १५८ टक्के वाढ नोंदली आहे. ऑगस्टमध्ये देखील इलेक्ट्रीक स्कूटरचा बाजारात मजबूत राहिला आहे. टीव्हीएसने ४८,८७३ इलेक्ट्रीक टू – व्हीलर रिटेल केले.
जर तुम्ही इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करु इच्छीत असाल तर Bajaj Chetak देखील चांगला पर्याय असू शकते. जुलैमध्ये ४७,१८४ युनिट विक्री झाल्या आहेत. गेल्या वर्षी ११,५८४ युनिटची विक्री झाली होती. वार्षिक आधारे याची विक्री वाढली आहे. इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांदरम्यान चेतकच्या मागणीत वाढ झाली आहे. आता पेट्रोल मॉडेलच्या सोबत इलेक्ट्रीक ऑप्शनकडे लोकांच्या नजरा वळल्या आहेत.
जर तुम्ही पेट्रोलच्या ऐवजी इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करु इच्छीत असाल तर TVS iQube वर देखील नजर टाकू शकता. जुलै २०२६ मध्ये या स्कूटरचे ५९,३८६ युनिट विक्री झाली होती. ही स्कूटर विक्रित चौथ्या क्रमांकावर होती. या स्कूटरी विक्रीत प्रत्येक हंगामात वाढ होत आहे.ऑगस्टमध्ये देखील इलेक्ट्रीक टु- व्हिलर टीव्हीएस ४८,८७३ युनिट्स विक्री झाली आहे.