भारताच्या प्रकाशानं नेपाळ उजळणार! संकटात सापडलेल्या मित्रदेशाला मदतीचा हात, भारतानं शेजारधर्म पाळला 
गणेश लटके September 14, 2026 09:13 PM

India and Nepal Electricity News : अचानक आलेल्या महापुरामुळं नेपाळमध्ये मोठा विध्वंस झाला आहे. जीवितहानी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. तेथील जनजीव विस्कळीत झालं आहे. या संकटात भारतानं आपला शेजारधर्म पाळला आहो. मोठ्या प्रमाणात नेपाळला भारताकडून मदत करण्यात आली आहे. अशातच आता भारताने नेपाळला वीजपुरवठा करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भारत नेपाळला आता 654 मेगावॅट वीज पाठवणार असून, त्यामुळे आजूबाजूच्या घरांमध्ये दिवसाचे 18 तास प्रकाश राहणार आहे. पाळमधील पुरामुळे जलविद्युत प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतानं मोठा निर्णय घेतला आहे. 

देशात असो वा परदेशात, वीज आणि पाण्याशिवाय जगणे कठीण असते. जर एखाद्या देशाला काही कारणास्तव विजेच्या तुटवड्याचा सामना करावा लागला, तर शेजारील देश अनेकदा मदतीसाठी पुढे येतात आणि भारतानेही तसेच केले आहे. दरम्यान, भारताने नेपाळला वीजपुरवठा करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नेपाळमधील अलीकडील विनाशकारी पुरामुळे सर्वजण हादरले असून, घरांपासून ते वाहनांपर्यंत सर्वांचे नुकसान झाले आहे. याचा नेपाळच्या वीज निर्मिती क्षमतेवरही गंभीर परिणाम झाला आहे, म्हणूनच भारत आता नेपाळला अतिरिक्त वीजपुरवठा करणार आहे.

महापुरामुळं नेपाळच्या वीज निर्मिती क्षमतेवर परिणाम 

भीषण पुरामुळे नेपाळच्या अनेक जलविद्युत प्रकल्पांवर गंभीर परिणाम झाला, ज्यामुळे नेपाळच्या वीज निर्मिती क्षमतेवर परिणाम झाला. मात्र, या कठीण काळात भारताने नेपाळला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.

भारत नेपाळला वीज पाठवणार

भारताने नेपाळला अतिरिक्त वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वीज दोन पारेषण वाहिन्यांमार्फत नेपाळमध्ये पोहोचेल. यामध्ये खालील वाहिन्यांचा समावेश आहे.

तनकपूर-महेंद्रनगर: 132 केव्ही सिंगल-सर्किट वाहिनीतून कमाल 54 मेगावॅट

मुझफ्फरपूर-ढालकेबर: ४०० केव्ही डबल-सर्किट वाहिनीतून कमाल ६०० मेगावॅट

ऊर्जा मंत्रालयाची मंजुरी

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ऊर्जा मंत्रालयाने नेपाळला वीज निर्यात करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे नेपाळच्या विजेची गरज मोठ्या प्रमाणात पूर्ण होऊ शकते. आता भारताने नेपाळला 654 मेगावॅटपर्यंत वीज निर्यात करण्याची परवानगी दिल्याने, ऊर्जा मंत्रालयाने वीज निर्यातीला मंजुरी दिली आहे. हा वीजपुरवठा 13 सप्टेंबर 2026 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत केला जाईल. दररोज 18 तासांसाठी 654 मेगावॅटपर्यंत वीज नेपाळ विद्युत प्राधिकरणाला निर्यात केली जाईल.

भारताने बांगलादेशसुद्धा केली मदत

भारताचा शेजारी देश बांगलादेशसुद्धा वीज संकटाचा सामना करत होता. यावेळी बांगलादेशने अतिरिक्त डिझेल पुरवठ्यासाठी भारताकडे मदतीची विनंती केली. भारत बऱ्याच काळापासून बांगलादेशला वीजपुरवठा करत असला तरी, वीज संकटाच्या काळात भारताने देशाला दिलासा देण्यासाठी वीज आणि इंधनाचा पुरवठा सुरू ठेवला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.