जिल्हापरिषद शाळेचे हजारो विद्यार्थी शालेय गणवेशापासून वंचितच; स्वतंत्र दिनी जुन्याच गणवेशात झेंडावंदन करण्याची नामुष्की 
तुषार कोहळे August 28, 2024 06:31 PM

Nagpur News नागपूर : केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना मोफत गणवेश योजनेचा (Marathi School Uniform News) लाभ देण्यात येतो. 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने देण्यात येत आहे. त्यासाठी सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करुन एकसमान एक रंगाचे दोन गणवेश (One State One Uniform) उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

एकसमान एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरुन उपलब्ध करुन देण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र आज या सूचना देऊन तीन महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असून एकट्या नागपूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी शालेय गणवेशापासून वंचित असल्याचे चित्र आहे. परिणामी, उद्या 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनी या विद्यर्थ्यांना जुन्याच गणवेशात झेंडावंदन करण्याची नामुष्की ओढवली आहे. 

स्वतंत्र दिनी जुन्याच गणवेशात झेंडावंदन करण्याची नामुष्की 

नागपूर जिल्हापरिषदच्या जवळपास 30 हजार विद्यार्थी चालू सत्रातील शालेय गणवेशापासून वंचित आहे. त्यामुळे उद्याच्या 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमात  या विद्यर्थ्यांना जुन्याच गणवेशात यावे लागणार आहे. एक राज्य एक गणवेश या योजने अंतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये समान धोरण स्वीकारले आहे. यानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळणे अपेक्षित असते. मात्र अजूनही नागपूर जिल्ह्यात शेकडो विद्यार्थी या शालेय गणवेशापासून वंचित असल्याचे पाहायला मिळत आहे.

नागपूर जिल्हा परिषदच्या अध्यक्षा मुक्तता कोकुड्डे यांनी राज्य सरकारच्या उदासीन धोरणाला यासाठी जबाबदार धरले आहे. परिणामी देशाच्या स्वतंत्र दिनीही या विद्यर्थ्यांना जुन्याच गणवेशात झेंडावंदन करण्याची नामुष्की ओढवली आहे. तर दुसरीकडे शासनाचे उदासीन धोरणांचा फटका जिल्हापरिषद शाळांमधील विद्यर्थ्यांना बसतो आहे. 

असा आहे गणवेश

इ.1 ली ते इ.4 थी मुली 

नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवार 
आकाशी रंगाच्या बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक 

स्काऊट व गाईड गणवेश -मंगळवार, गुरूवार व शनिवार
गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक

इयत्ता 5 वी मुली

नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवार 
आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट

स्काऊट व गाईड गणवेश  -मंगळवार, गुरूवार व शनिवार
गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक

इ.6 वी ते इ.8.वी मुली आणि इ.1 ली ते इ.8 वी मुली (ऊर्दू माध्यम)

नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवार 
आकाशी निळ्या रंगाची कमीज, निळ्या गडद रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी

स्काऊट व गाईड गणवेश -मंगळवार, गुरूवार व शनिवार
गडद आकाश निळ्या रंगाची कमीज, गडद निळ्या रंगाची सलवार, गडद निळ्या रंगाची ओढणी

इ.1 ली ते इ.7 वी मुले-

नियमित गणवेश - सोमवार, बुधवार व शुक्रवार 
आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळया रंगाची हाफ पॅन्ट

स्काऊट व गाईड  -मंगळवार, गुरूवार व शनिवार
स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट 

इ.8 वी मुले

नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवार 
आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळया रंगाची फुल पॅन्ट

स्काऊट व गाईड -मंगळवार, गुरूवार व शनिवार
स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पैट

हे ही वाचा 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.