नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून मोठी अपडेट, यूजीसी नेटसह तीन परीक्षांच्या तारखा नव्यानं जाहीर
युवराज जाधव September 05, 2024 06:13 PM

राष्ट्रीय चाचणी संस्थेने रद्द केलेल्या आणि पुढे ढकललेल्या परीक्षांच्या नवीन तारखांची घोषणा शुक्रवारी रात्री उशिरा केली. त्यात कथित अनियमिततेच्या आरोपांवरून वादात सापडलेल्या यूजीसी नेटचा समावेश आहे. संयुक्त सीएसआयआर-यूजीसी नेट २५ ते २७ जुलैदरम्यान आयोजित केली जाईल, तर यूजीसी नेट जून २०२४ परीक्षा २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान घेतली जाईल.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या विविध परीक्षांमधील कथित अनियमितता प्रकरणी विद्यार्थी दिल्लीच्या जंतर मंतरवर बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. शुक्रवारी तिसऱ्या दिवशी देखील धरणे आंदोलन सुरु होतं. डाव्या पक्षांशी संबंधित विद्यार्थी संघटना ऑल इंडिया स्टूडेंट एसोसिएशन (आईसा)आणि दिल्ली विद्यापीठातील क्रांतिकारी युवा संगठन (केवायएस) यांच्यासह इतर प्रमुख विद्यार्थी संघटना धरणे आंदोलन जंतर मंतरवर करत आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी विसर्जित करणे याशिवाय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. 

NEET : लातुरात सापडलेली अॅडमिट कार्ड बिहारच्या विद्यार्थ्यांची, विद्यार्थ्यांकडून घोटाळा होणाऱ्या सेंटरची निवड

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.