Latest Marathi News Updates : नबी करीम भागात इमारतीचा काही भाग कोसळला, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीनपैकी दोघांना वाचवण्यात यश
esakal September 13, 2024 01:45 PM
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर तयारी सुरू

राजौरी, जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर सुरू तयारी आहे.

Pavana Dam LIVE : पवना धरण शंभर टक्के भरले

मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरल्याने पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तळशी गेलेलं पवना धरण शंभरीच्या जवळपास पोचले होते.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंतांच्या घरासमोर गोळीबार

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या परंडा तालुक्यातील सोनारी येथील घरासमोर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. काल मध्यरात्री 12 वाजून 37 मिनिटांनी दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवर येऊन गोळीबार केल्याचा दावा धनंजय सावंत यांच्या सुरक्षारक्षका कडून करण्यात आला असून सुरक्षा रक्षक आंबी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झालेत.

Fire Department : नबी करीम भागात इमारतीचा काही भाग कोसळला, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीनपैकी दोघांना वाचवण्यात यश

दिल्ली : नबी करीम भागात इमारतीचा काही भाग कोसळला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीनपैकी दोघांना वाचवण्यात यश आले आहे. सध्या येथे बचावकार्य सुरू आहे.

HD Kumaraswamy : हिंसाचारानंतर केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांची मंड्या जिल्ह्यातील नागमंगलाला भेट

कर्नाटक : केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी मंड्या जिल्ह्यातील नागमंगला गावाला भेट दिलीये. येथे गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची घटना घडल्यानंतर हिंसाचार उसळला आहे. सीएम सिद्धरामय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी 50 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

Uttarakhand News : भूस्खलनामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग ठप्प

चमोली, उत्तराखंड : बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग कामेडा, नंदप्रयाग आणि छिंका येथे भूस्खलनामुळे हा मार्ग ठप्प झाला आहे.

Arvind Kejriwal Bail : CM केजरीवाल तुरुंगातून बाहेर येणार की नाही? सर्वोच्च न्यायालय आज देणार निकाल

नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्यातील भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सीबीआय अटकेला आणि जामिनाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने ५ सप्टेंबर रोजी या खटल्यावरील युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता.

North Korea LIVE : उत्तर कोरियाने दोन महिन्यांनंतर क्षेपणास्त्र डागले

सोल : उत्तर कोरियाने समुद्रात एक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे. संभाव्य युद्धासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत, असा इशारा उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता. उत्तर कोरियाने दोन महिन्यांनंतर क्षेपणास्त्र डागले आहे.

Dengue Patient LIVE : राज्यात डेंगीच्या रुग्णसंख्येत वाढ, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

Latest Marathi Live Updates 13 September 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन श्रीगणेशाची पूजा केल्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीएम) ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी (वय ७२) यांचे ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. महाराष्ट्रात पाऊसमान चांगले झाले असले तरी पावसाळी आजारदेखील वाढले आहेत. त्याचबरोबर पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील अनेक दिवस बंद असलेला कागल येथील चेकपोस्ट खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्यातील भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सीबीआय अटकेला आणि जामिनाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. आरक्षणविरोधी वक्तव्य केल्याने राहुल गांधींविरोधात भाजपने राज्यभरात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून काही भागात पाऊस पडत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.