अमित शाहांवर खटला दाखल होता तेव्हा अनेकांचे दरवाजे मदतीसाठी ठोठवायचे : संजय राऊत
Marathi January 15, 2025 03:29 PM

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेवर भाष् केलं. अमित शाह यांनी शिर्डीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेली त्यांनी अमित शाह यांच्यासंदर्भातील दिल्लीतील एक किस्सा सांगिताला.

मला वाटतं शरद पवार साहेबांनी एक माहिती दिली आहे, आणि ती माहिती सध्याच्या देशाच्या गृहमंत्र्यांच्या संदर्भात आहे. पवार साहेब जो प्रसंग सांगत आहेत, तेव्हा अमित शाह हे त्यावेळेचे गुजरात दंगलीचे बरखास्त गृहराज्य मंत्री होते, त्यांच्यावर खटला दाखल चालू होता, त्याकाळात ते अनेकांचे दरवाजे मदतीसाठी ठोठावत होते, माननीय शरद पवार असतील, माननीय हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील,  मी देखील त्यांना अनेक वेळा अरुण जेटली यांच्या संसदेच्या कार्यालयाबाहेर बसलेले बघितले आहेत.  माणूस संकटात असताना अनेकांचे दरवाजे ठोठावतो. ज्यानं संकट काळात मदत केली, ज्यानं चांगल्या प्रकारे मदत केली अशा नेत्या, अशा कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा आम्ही कधी पाहिली नाही.

आता काय झालंय हे पवार साहेबांनी सांगितलंय ती पण थोडी अर्धवट माहिती आहे. मी गुप्ततेला बांधलेला माणूस आहे. काही गोष्टी गोपनीय असतात, शक्यतो त्याचा बभ्रा करायचा नसतो.  केलेली मदत असते ते या हाताचं त्या हाताला कळता कामा नये, हा हिंदुत्त्वाचा धर्म आहे आणि आम्ही हिंदुत्त्ववादी आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

माननीय बाळासाहेबांनी मदत नरेंद्र मोदींना देखील केली आहे, देश विरोधात असताना, तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडून त्यांना मुख्यमंत्री पदावरून काढण्याच्या तयारी झाली होती. बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नेते त्यांच्या मागे ठाम पणे उभे होते. असेच काही तरच अमित शाह यांच्या बाबतीत झाले असेल, त्याशिवाय पवार साहेब असेल बोलणार नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.

पंतप्रधान आहेत त्यांनी देशभरात फिरायला पाहिजे, विविध कामांची उद्घाटनं करावी लागतात, असं संजय राऊत म्हणाले. मुंबईच्या विकासासाठी प्रधानमंत्री येत असतील तर स्वागत आहे, अदानीच्या विकासासाठी नाही, मुंबईच्या विकासासाठी येत असतील तर,  धारावीचा प्रश्न अजून प्रलंबित आहे असं संजय राऊत म्हणाले.   प्रधानमंत्री मणिपूरमध्ये कधी जाणार आहेत हा देखील प्रश्न आहे, दिल्ली निवडणुका झाल्या की त्यांनी मणिपूरमध्ये जावे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

इतर बातम्या :

लोकांचा आक्षेप आकाच्या आकावर, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीच्या ‘त्या’ कृतीला अर्थ नाही : संजय राऊत

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.