हिवाळ्यात ‘हे’ 9 पदार्थ खाण्यास करा सुरुवात, मूड स्विंग्स होतील दूर
GH News January 15, 2025 07:12 PM

हिवाळ्याच्या हंगामात बऱ्याच लोकांसाठी मूड स्विंग आणि थकवा येण्याची समस्या सामान्य आहे. कमी सूर्यप्रकाश आणि थंड तापमानाचा परिणाम तुमच्या शरीरावर आणि मनावर होतो. बाहेरील वातावरणात थंडवा आणि सुर्प्रकाशाचा अभाव यामुळे चिडचिडेपणा निर्माण होतो. पण तुम्ही याची काळजी करू नका. काही खाद्यपदार्थांच्या (हेल्दी विंटर फूड्स) मदतीने तुम्ही हिवाळ्यातही तुमचा मूड सुधारू शकता. चला जाणून घेऊया त्या खाद्यपदार्थांबद्दल जे केवळ चविष्टच नाहीत तर तुमचे मन ही प्रसन्न ठेवतात.

हिवाळ्यात मूड का बिघडतो?

सेरोटोनिनची कमतरता – हिवाळ्यात कमी सूर्यप्रकाशामुळे तुमच्या शरीरातील सेरोटोनिन नावाच्या संप्रेरकांचा स्राव कमी होतो. सेरोटोनिनला आनंदी संप्रेरक देखील म्हणतात आणि थंडीच्या दिवसात अचानक शरीरात याची पातळी कमी होते त्यामुळे मूड स्विंग्स, नैराश्य आणि चिंता उद्भवू शकते.

व्हिटॅमिन डीची कमतरता- सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन-डी मिळते, जे हाडांसाठी आवश्यक आहे आणि मूड सुधारण्यास देखील मदत करते. मात्र थंडीच्या दिवसात कमी सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन-डीची कमतरता उद्भवू शकते.

मेलाटोनिनची पातळी- हिवाळ्यात दिवस कमी आणि रात्री लांब असतात. यामुळे आपल्या शरीरात मेलाटोनिन नावाच्या संप्रेरकाचा स्राव वाढतो, जो झोपेवर नियंत्रण ठेवतो. जास्त मेलाटोनिनमुळे सुस्त भावना देखील उद्भवते, ज्यामुळे मूड खराब होऊ शकतो.

मूड सुधारणारे हिवाळ्यात सेवन करा हे पदार्थ

डार्क चॉकलेट: डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल असतात, जे मेंदूत रक्त प्रवाह वाढवतात आणि सेरोटोनिनची पातळी वाढवतात.

अक्रोड: अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड असते, जे मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले असतात आणि मूड सुधारण्यास मदत करतात.

बदाम: बदामात मॅग्नेशियम असते, जे तणाव कमी करण्यास मदत करते. यामुळे चिडचिडेपणा कमी होतो.

केळी: केळीमध्ये व्हिटॅमिन बी 6 असते, जे सेरोटोनिनच्या स्रावास मदत करते.

हिरव्या पालेभाज्या: पालक, मेथी आणि इतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, ज्यामुळे मूड सुधारण्यास मदत होते.

संत्र: संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-सी असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि मूड सुधारण्यास मदत करते.

आले: आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे तणाव कमी करण्यास मदत करतात.

दही: दहीमध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले असतात आणि मूड सुधारण्यास मदत करतात.

मासे: माशांमध्ये ओमेगा -3 फॅटी ॲसिड असतात, जे मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले असतात आणि मूड सुधारण्यास मदत करतात.

या टिप्सही ठरतील उपयुक्त

दररोज काही वेळ उन्हात बसल्याने व्हिटॅमिन-डी मिळेल आणि मूड सुधारेल.

नियमित योगा आणि व्यायामामुळे तणाव कमी होतो आणि मूड सुधारतो.

दररोज 7-8 तासांची झोप घेणे देखील खूप महत्वाचे आहे.

मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवल्यास आनंदीत राहाल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.