‘रिवायत’ सांगीतिक कार्यक्रम शुक्रवारी
पुणे, ता. १५ ः सुहाना बसंत या संस्थेतर्फे सतारवादक उस्ताद हमीद खाँ यांच्या स्मरणार्थ शुक्रवारी (ता. १७) ‘रिवायत’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शिवाजीनगर येथील घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू सभागृहात सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी ‘त्रिगुणा स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’चे विद्यार्थी ‘सुकून’ आणि ‘शकरगुजारी’ हे सामूहिक सतारवादन आणि समूहगायनाचे कार्यक्रम सादर करतील. दुसऱ्या सत्रात ‘शाद’ हा रईस बाले खाँ आणि उस्ताद हमीद खाँ यांचे सुपुत्र मोहसीन हमीद खाँ यांचा गायन व सतार जुगलबंदीचा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाची सांगता ज्येष्ठ गायक पं. उपेंद्र भट यांच्या गायनाने होईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
----
अमोल निसाळ यांची
सोमवारी मैफील गायन
पुणे, ता. १५ ः संस्कार भारती पुणे महानगर, व्हायोलिन अकादमी आणि श्री ओंकारेश्वर मंदिर यांच्यातर्फे सोमवारी (ता. २०) पं. अजय चक्रवर्ती यांचे शिष्य अमोल निसाळ यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत मैफिलीचे आयोजन केले आहे. शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिरात सायंकाळी ६ वाजता ही मैफील होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.