Nashik Accident: अमळनेरच्या दाम्पत्यावर "संक्रात"; ट्रॅव्हल्सचा अपघात अन् जोडप्याचा मृत्यू
esakal January 15, 2025 10:45 PM

Amalner News: मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा १५ रोजी पहाटे ३:३४ वा अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले आहेत मयतात दोघे अमळनेरचे आहेत

यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथे पुलावर कंटेनर, ट्रक आणि श्री गणेश राम ट्रॅव्हल्स खासगी बस एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला.

महामार्गावर भीषण अपघात झाल्याचं समजताच गावकरी घटनास्थळावर धावले. तात्काळ मदतीचा हात पुढे केला. अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पियुष पाटील आणि वृंदा पियुष पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. १४ जण जखमी आहेत. यापैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ठाणे येथे पाठवण्यात आले आहे. पियुष बीएमसी मुंबई ला नोकरीला होते तर वृंदा जिप शाळा बोरगाव येथे युवा प्रशिक्षणार्थी होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.