-rat१३p३८.jpg
५N३८३६५
- राजापूर ः सामूहिक पुस्तक वाचनामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी.
--
नारकर वाचनालयात सामूहिक वाचन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ ः वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत तालुक्यातील पाचल येथील ज्ञा. म. नारकर वाचनालयामध्ये पुस्तकांचे सामूहिक वाचन करण्यात आले. या वेळी मांडण्यात आलेल्या प्रदर्शनातील विविध पुस्तकांचे वाचन करण्याचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.
सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी यामध्ये सहभागी झाल्या होत्या. ग्रंथपाल विठोबा चव्हाण यांनी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. वाचनालयाचे कार्यवाह विनायक खानविलकर यांनी वाचनालयात असलेल्या स्पर्धा परीक्षा विषयीच्या पुस्तकांचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपयोग करण्याचे आवाहन केले. या वेळी विद्यार्थ्यांचे स्वागत ग्रंथपाल चव्हाण यांनी केले तर आभार लिपिक साक्षी सुतार यांनी मानले.