तिरुपती
आंध्रप्रदेशच्या चंद्रगिरी येथे एक रस्ते दुर्घटना झाली असून यात 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन बसेसची टक्कर झाली आहे. यातील एक बस तिरुपतिहून पिलेरूच्या दिशेने जात होती. तर दुसरी बस मदनपल्ले येथून तिरुपतिच्या दिशेने येत होती. या दुर्घटनेत दोन्ही बसेसचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. दुर्घटनेचा कारणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.