Marathi Entertainment News : काल 14 जानेवारीला सगळीकडे मकरसंक्रांतीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. नुकतंच लग्न झालेल्या माताही कलाकारांनीही त्यांची पहिली मकरसंक्रांत थाटात साजरी केली. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रतापनेही त्याची पत्नी प्राजक्ताबरोबर मकरसंक्रांत उत्साहात साजरी केली. पण सध्या त्याचं एक रील व्हायरल होतंय. काय आहे या रीलमध्ये जाणून घेऊया.
पृथ्वीकने काळ बायको बरोबर मकरसंक्रांतीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला. त्यातीलच एक फनी रील त्याने आज सोशल मीडियावर शेअर केलं. या रीलमधील पृथ्वीकची अवस्था बघून नेटकऱ्यांना हसू अनावर झालं. पृथ्वीकची अवस्था बघून सगळ्यांनी त्याला चिडवलंही.
रीलमध्ये पाहायला मिळालं कि, प्राजक्ताने त्याला तिळगुळ देत संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. प्राजक्ता म्हणाली कि,"पृथ्वीक तिळगूळ घे आणि गोड गोडच बोल!" त्यावर बायकोला शुभेच्छा देताना पृथ्वीक म्हणाला की, "प्राजक्ता तू सुद्धा, तिळगूळ घे आणि थोडं थोडंच बोल". त्यावर प्राजक्ता चिडली आणि त्याला घराबाहेर काढलं. पृथ्वीकने माफी मागूनही त्याला घरात घेतलं नाही.
हे पाहून अनेकांनी खिल्ली कमेंट्समध्ये उडवली. प्राजक्ताने माळीने यावर असंच पाहिजे असं म्हणत बायकोच्या वागण्याचं समर्थन केलं. तर "वहिनींनी एक शब्द ही बोलला नाही" दिवशी कमेंट एकाने केली. तर एकाने "रहा आता बाहेरच, थोडंच बोलायचं होत ना तूपण" अशी कमेंट करत त्याची खिल्ली उडवली.
पृथ्वीक आणि प्राजक्ताने 25 ऑक्टोबरला लग्नगाठ बांधली. गेली अनेक वर्षं ते रिलेशनशिपमध्ये होते.