Maharashtra Rain Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. विदर्भामध्ये मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. मात्र आता आजपासून राज्यात पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून राज्यामधील पावसाचा जोर कमी होईल, असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.
Maharashtra Politics : भाजपचा विरोध, महायुतीत वादाचा 'बुरखा'; शिंदेंच्या शिवसेनेला मुस्लिम मतांचा धसका? वाचामध्य भारतामध्ये कमी दाबाचे क्षेत्राने बाष्प खेचून नेल्याने राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील तीन ते चार दिवस पाऊस विश्रांती घेणार असून पुढील आठवड्यात म्हणजेच सोमवारपासून (ता. १६) विदर्भात पुन्हा पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे. आज (ता. १३) राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काल (गुरुवार,ता. १२) महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामधील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तसेच कोकण, मुंबई, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मात्र आजपासून राज्यात आठवडाभर पाऊस विश्रांती घेणार असून पुढील आठवड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Karjat Crime: कर्जत कारचालाकाला अमानुष मारहाण प्रकरण, शिंदे गटाच्या आमदाराच्या कथित बॉडीगार्डला अटकदरम्यान, गेल्या आठवड्यात विदर्भामध्ये पावसाने धुमाकूळ घातला होता. या मुसळधार पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले होते, त्यामुळे बळीराजा संकटात सापडला होता. त्यामुळेच पावसाचा जोर कमी होण्याची बळीराजा वाट पाहत होता. अशातच हवामान खात्याने पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Pune News : दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने विमानात सिगारेट ओढली, नेमकं काय घडलं?