मोठी बातमी : राजश्री उंबरे यांचे उपोषण स्थगित, मनधरणी करण्यात शिष्टमंडळाला यश, सरकारला 2 आठवड्य
Marathi September 16, 2024 03:24 AM

Rajashree Umare, छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या राजश्री उंबरे यांनी आज (दि.15) उपोषण स्थगित केले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात गेल्या 14 दिवसांपासून उपोषण सुरू होतं. राजश्री उमरे यांची मनधरणी करण्यात सरकारच्या शिष्टमंडळात यश आले. सरकारकडून दोन आठवड्यांची मुदत त्यांच्या मागण्यात आली. सरकारला 2 आठवड्याची देण्यात आली आहे. तोपर्यंत उपोषण स्थगित करत असल्याचं राजश्री उमरे यांनी सांगितलं. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री दीपक केसरकर आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.

राजश्री उंबरे यांच्या भेटीसाठी सरकारचा शिष्टमंडळ दाखल झाले होते

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात उपोषण करणाऱ्या राजश्री उंबरे यांच्या भेटीसाठी सरकारचा शिष्टमंडळ दाखल झाले होते. मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपस्थित आहे. सरकारच्या शिष्टमंडळाची राजश्री उंबरे यांची मनधरणी करण्यास यश आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची धार कमी व्हावी, यासाठी उंबरे उपोषणाला बसल्या आहेत, असा आरोपही करण्यात आला होता.

हैदराबाद गॅझेट लागू करून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे

छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका तरुणीने उपोषण सुरू केले होते. राजश्री उंबरे पाटील असे या तरुणीचं नाव आहे. मराठा समाजाला  आरक्षण द्या , मराठवाड्यात हैदराबाद गॅझेट लागू करून त्याआधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. यापूर्वी EWS कोठ्यातून मराठा समाजाला दिलेले आरक्षण देण्यात यावे, शेतकरी, कामगार आणि शेतमजूर मुलांचे शिक्षण पूर्णपणे मोफत करण्याच्या प्रमुख मागण्यासाठी हे उपोषण केले जात आहे.

गॅझेटचा मुद्दा कॉमन असून त्यासाठी आंदोलन सुरू आहे. दोघांशी बोलून आंदोलन विषयी बोलले जाणार आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील किती तालुके याचा विचार करुन इंडेक्स विचार करू. कोर्टाने आरक्षणाला स्टे दिला नाही. 10 टक्के आरक्षण लागू आहे. दोन समाजात फूट करू नये. दोघांशी बोलून विचार करू. एकी राहायला हवी”, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीला मान देऊन उपोषण मागे घ्या. तुमचे बहुतांश मुद्दे मान्य झाले असून उपोषण मागे घ्यावे, अशी विनंतीही दीपक केसरकर यांनी उंबरे यांच्याशी बोलताना केली.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.