मनोज जरांगे पाटील आज मध्यरात्रीपासून पुन्हा उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
GH News September 16, 2024 03:11 PM

मनोज जरांगे पाटील आज मध्यरात्री १२ वाजेपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहे. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील आजही ठाम आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मराठावाडा मुक्तिसंग्राम दिनाचं औचित्य साधत आजपासून मध्यरात्री १२ वाजेपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून उपोषणाची हाक दिली आहे. गेल्या एका वर्षापासून मनोज जरांगे हे सरकारला मुदत देऊन आंदोलन करत आहे. आतापर्यंत पाच वेळा जरांगे पाटील हे ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र अद्याप मनोज जरांगे पाटील यांची ओबीसी समाजातून मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची मागणी पूर्ण झालेली नाही.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.