Fashion Tips : सिंपल लूकला देखील आकर्षक बनवतील कीर्ती सुरेशच्या या साड्या
Marathi September 16, 2024 06:25 PM

कीर्ती सुरेश साऊथ इंडियन चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे, ती तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम या चित्रपटांमध्ये काम करते. तिने अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. तिच्या अभिनयामुळे तिने लोकांच्या मनात घर केले. बऱ्याचदा कीर्ती सुरेशच्या साड्या या सिंपल असतात पण खूप आकर्षक असतात. कीर्ती नेहमीच पारंपरिक लूक सहजपणे कॅरी करते. आज आपण जाणून घेऊया कीर्तीच्या अशा कोणत्या साड्या आहेत, ज्या सिंपल लूकला आकर्षक बनवतील.

कॉटन साडी आणि सिल्क साडी
(प्रतिमा स्त्रोत: सोशल मीडिया)

कॉटनची साडी :

कॉटनच्या साडीमध्ये कीर्ती खूपच सुंदर दिसते. या साडयांवर तुम्ही कमी एक्सेसरीस किंवा नाही घातले तरी चांगले दिसतात. साधे रंग आणि क्लासिक डिझाईनमुळे ही कॉटनची साडी खूप सुंदर दिसते.

सिल्क साड्या :

कीर्तीने अनेकदा सिल्कच्या साड्यांमध्ये क्लासिक लूक केला आहे. यामध्ये सोनेरी किनारी असलेल्या साड्या एलिगंट लूक देतात.

हातमाग साडी आणि साधी निळी साडी
(प्रतिमा स्त्रोत: सोशल मीडिया)

हॅण्डलूम साड्या :

कीर्ती सुरेशला हॅण्डलूमच्या साड्या खूप आवडतात. या साड्या खूप सिंम्पल दिसतात. पण या साड्या खूप क्लासिक आणि एलिगंट लूक देतात. जर तुम्हाला साधासा लूक करायचा असेल तर हॅण्डलूमच्या साड्या तुम्ही नेसू शकता.

साधी निळी साडी:

कीर्ती सुरेशने एका फोटोशूटमध्ये प्लेन ब्लू साडी नेसली होती. या साड्या दररोज नेसायलादेखील चांगल्या आहेत.

प्रिंटेड साडी आणि टिश्यू साडी
(प्रतिमा स्त्रोत: सोशल मीडिया)

प्रिंटेड साडी:

सफेद आणि लाल साडीमध्ये कीर्ती सुरेश खूप सुंदर दिसते. या साड्या खूप आरामदायी असतात. या साड्यामध्ये आपण कोणतेही काम सहजपणे करू शकतो. या प्रिंटेड साड्यादेखील तुम्ही नेसू शकता.

टिशू साडी :

आजकाल टिशू साडी खूप ट्रेंडमध्ये आहे. जर तुम्हाला तुमचा लूक ट्रेंडिंग बनवायचा असेल तर तुम्ही या टिशू साडी नेसू शकता.

या कीर्ती सुरेशच्या सिंपल लूक देणाऱ्या पण खूप सुंदर आणि आकर्षक दिसणाऱ्या साड्या तुम्ही नेसू शकता.


संपादन- तन्वी गुंडये

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.