Marathwada Mukti Sangram Din 2024 Wishes Quotes Images : मित्रमैत्रिणींना पाठवा हे खास शुभेच्छा मेसेजेस, त्यांनाही स्मरणात राहील आजचा हा खास दिवस
Times Now Marathi September 16, 2024 07:45 PM

Marathwada Mukti Sangram Din 2024 Wishes, Quotes, Images : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा महाराष्ट्र राज्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. यंदा मराठवा़डा मुक्तीसंग्राम चा 76 वा वर्धापन दिन आहे. दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वातंत्र्य झाला. मात्र निजामाच्या ताब्यात असलेल्या हैदराबाद संस्थानामध्ये महाराष्ट्रातील 8 जिल्हे होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी मराठवाडा स्वातंत्र्य झाला.

यासाठी उभारलेल्या लढ्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. आज या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा (Marathwada Liberation Day) तुमच्या मराठवाड्यातील मित्रमंडळींना, नातेवाईकांना खास खास Wishes, Quotes, Images च्या माध्यमातून शेअर करून आजचा दिवस साजरा करा.

संग्राम मराठवाडा मुक्ती संग्रामचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले. भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 दिवशी लष्करी फौजा निजामाच्या संस्थानामध्ये घुसवल्या. या कारवाईला पोलिस अॅक्शन असेही म्हणतात. अखेर 17 सप्टेंबरला निजाम भारत सरकारला शरण आला आणि हैदराबाद संस्थान भारतामध्ये समविष्ट झाले.

त्यावेळच्या 565 पैकी 562 संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद संस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि जुनागड संस्थान ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान यांचे राज्य होते.

हैदराबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निझाम वंशाचे राज्य होते. त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरू झाला होता. अखेर 17 सप्टेंबर रोजी मराठवाड्याला निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला. त्यामुळे हा दिवस मराठवड्यातील जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे आदी नेत्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामासाठी लढा दिला. मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले.





मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा




मुक्ती संग्राम लढ्यातील सर्व हुतात्मांना
विनम्र अभिवादन!





मराठवाडा मुक्तीसाठी शहीद झालेल्या
सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!





मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या
सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!





मराठवाडा मुक्तीसंग्रामातील शूरवीरांना
विनम्र अभिवादन!
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!





धडक कारवाईमुळे निजाम राजवट पूर्ण झाली खिळखिळी,
गुलामगिरीचे तोडून साखळदंड स्वातंत्र झाली मराठवाडा भूमी,
जान ठेवून भूमीपुत्रांच्या त्याग बलिदानाची...
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.