व्ही जॉन इंडियाने शेविंग क्रीम आणि फोमने साकारली आशियातील पहिली 8 फुटी गणेशाची मूर्ती, 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये झाली नोंद
Times Now Marathi September 16, 2024 08:45 PM

मुंबई : सर्जनशीलता, परंपरा आणि नावीन्याचा अनोखा मेळ घालत, व्ही जॉन इंडिया (V JOHN) या पुरुषांसाठीच्या ग्रुमिंग क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने 8 फुटी गणपतीची आकर्षक मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती पूर्णपणे शेविंग क्रीम (Shaving Cream) आणि फोम (Foam) वापरून बनविण्यात आली आहे. पुण्यातील ग्रँड स्ट्रीट मॉल (Grand Street Mall Pune) येथे 'व्ही जॉन गणपती' (VJOHN Ganpati) नावाने या मूर्तीची स्थापना आली आहे. शेविंग क्रीम आणि फोमपासून बनविलेल्या या मूर्तीला एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सर्वात मोठ्या गणपतीचे अधिकृत स्थान मिळाले आहे.

दैनंदिन जीवनातील ग्रुमिंगचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या व्ही जॉन इंडियाच्या प्रयत्नांतून ही सर्जनशील मूर्ती साकारण्यात आली आहे. हुशारी, नवा आरंभ आणि यशाचे प्रतीक असलेल्या गणरायाची निवड करत व्ही जॉन ब्रँडने सेल्फ केयर व ग्रुमिंगचे महत्त्व कल्पकतेने इतरांपर्यंत पोहोचविले आहे. हा संदेश प्रभावीपणे देण्यासाठी व्ही जॉन गणपती, व्ही जॉनची अत्याधुनिक उत्पादने – व्ही जॉन प्रीमियम शेविंग क्रीम आणि व्ही जॉन स्पेशल मॉइश्चरायझिंग फॉर्म्युला- बेस्ड शेविंग फोम वापरून साकारण्यात आला आहे.

टाईम्स नाऊ मराठीवर गणपतीशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हा अशा प्रकारचा पहिलाच गणपती साकारण्यासाठी शेविंग क्रीम आणि फोमचे 3,500 युनिट्स वापरण्यात आले असून, 15 दिवसांच्या अथक मेहनतीतून मूर्ती तयार करण्यात आली आहे. ही मूर्ती नेत्रदीपक आमि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असून, ग्रुमिंग आणि सेल्फ-केयर ही ब्रँडची तत्त्वे ठळकपणे अधोरेखित करणारी आहे.

पर्सनल केअरलाही आयुष्यात महत्त्वाचे स्थान असायला हवे - आशुतोष चौधरीगणेश चतुर्थी हा भक्तीचा, नवी सुरुवात करण्याचा आणि उत्सवाचा काळ असतो. ज्याप्रकारे गणपती बाप्पांना आपल्या हृदयात महत्त्वाचे स्थान आहे, त्याप्रमाणे पर्सनल केअरलाही आयुष्यात महत्त्वाचे स्थान असायला हवे, हे आम्हाला अधोरेखित करायचे होते. व्ही जॉन गणपतीच्या माध्यमातून आम्ही परंपरा जपत ग्रुमिंगचे महत्त्व कल्पकतेनं दाखविले आहे असे याप्रसंगी व्ही जॉन इंडियाचे विपणन व्यवस्थापक आशुतोष चौधरी म्हणाले.

Lalbagcha Raja 2024 Visarjan : लालबागच्या राजाची विसर्जनाची लगबग सुरू, दर्शन रांग बंद; भाविकांची गर्दी ओसरली

व्ही जॉन गणपतीच्या अनावरणप्रसंगी मॉलमधील ग्राहक आणि भक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला. उत्सवी काळात ब्रँडचे ग्राहकांशी असलेले नाते आणखी दृढ होण्यास मदत झाली आहे.

या उपक्रमासह व्ही जॉन इंडियाने गणेश चतुर्थीचा उत्सव आणि ब्रँडचे तत्त्व यांचा यशस्वीपणे मेळ घालत परंपरा व आधुनिक मूल्यांशी सुसंगत अविस्मरणीय मार्केटिंग कॅम्पेनची निर्मिती केली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.