परुळे परिसरात निवारा शेड
esakal September 17, 2024 01:45 AM

12120

परुळे परिसरात निवारा शेड
म्हापण, ता. १६ ः माजी सभापती नीलेश सामंत यांच्या माध्यमातून परुळे शेळपी बीब्याची राई येथील एसटी बस थांबा येथे निवारा शेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. येथील ग्रामस्थांच्या कित्येक दिवसांच्या मागणीला दाद देत श्री. सामंत यांनी आपल्या माध्यमातून ग्रामस्थांचा हा प्रश्न मार्गी लावला. याबद्दल येथील ग्रामस्थांनी श्री. सामंत यांचे आभार व्यक्त केले. बांधण्यात आलेल्या या शेडचे उद्घाटन नुकतेच भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पाटकर यांनी केले. यावेळी राजन परब, रमेश गावडे, दत्ता परब यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. या शेडमूळे पावसाळ्यात होणारी प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.