'निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावा'
esakal September 17, 2024 01:45 AM

पिंपरी, ता. १६ ः डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत भोजन, निवास व निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करावा. अशी मागणी दीपू फाउंडेशनचे अध्यक्ष अमर एकाड यांनी उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांकडे केली आहे. अन्यथा या मागणीसाठी १८ सप्टेंबर २०२४ रोजी थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे.
शासन निर्णय १३ ऑक्टोबर २०१६ नुसार डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत वस्तीगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी प्रतिमहा तीन हजार रुपये व अन्य ठिकाणी असलेल्या वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी प्रतिमाह दोन हजार रुपये इतका निर्वाह भत्ता देण्याचे प्रस्तावित केले होते. शासन निर्णय ५ जानेवारी २०२४ नुसार आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकातील वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व निर्वाह खर्च मागवण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून नवीन दराने निर्वाह भत्ता पात्र विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.