Snoring Remedies : झोपेत घोरण्याचा त्रास? मग करा हे उपाय
Marathi September 17, 2024 02:24 AM

रात्री झोपेत बऱ्याच जणांना घोरण्याची सवय असते. रात्री ते इतके मोठमोठ्याने घोरतात की, बाजूला झोपणाऱ्याची झोपमोड तर नक्कीच होते. आपण झोपेत असल्यावर आपण झोपेत घोरतोय हे कळत नाही. पण, सकाळी उठल्यावर मात्र जेव्हा घोरण्यावरून सगळ्यांची बोलणी खावी लागतात, तेव्हा मात्र अपमानित झाल्यासारखे वाटते. त्यामुळे तुम्ही सुद्धा घोरण्याच्या समस्येला कंटाळते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. आज आम्ही तुम्हाला घोरण्यावर काही घरगुती उपाय सांगणार आहोत. पण, त्याआधी जाणून घेऊयात घोरणे म्हणजे नक्की काय,

घोरणे म्हणजे नक्की काय ?

घोरणे म्हणजे श्वासोच्छवासासह होणारे मोठे आवाज आणि कंपने. खरं तर, घोरणे ही झोपेशी संबधित एक समस्या आहे. घोरताना नाकातून आणि तोंडातून आवाज येतात. हा आवाज तुम्हाला झोप लागल्यावर येतो.

घोरण्यावरील उपाय –

घोरणे थांबवण्यासाठी तुमची झोपेची पद्धत बदला. झोपताना कुशीवर झोपण्याची सवय लावा, या सवयीमुळे घोरण्याची समस्या नक्कीच बदलू शकते.

घोरण्याच्या समस्येला कुठेतरी मद्यपान करणे कारणीभूत ठरू शकते. कारण झोपण्यापूर्वी जर तुम्ही मद्यपान केले नाही तर घशाच्या स्नायूंना आराम मिळतो. परिणामी, घोरण्याची समस्या जाणवत नाही.

भरपर प्रमाणात पाणी प्या, कारण कोरड्या श्वासनलिकेमुळे घोरण्याची समस्या जाणवते. त्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी प्या.

डॉक्टरांच्या म्हणण्यानूसार, नाक साफ असल्यास घोरण्याची समस्या जाणवत नाही. त्यामुळे नाक साफ ठेवण्यासाठी रोज झोपण्यापूर्वी देशी तुपाचे काही थेंब नाकात जरूर टाका. फक्त तुप कोमट असल्याची खात्री करा.

पूर्ण झोप होते का नाही याची खात्री करा. तुमच्या पूर्ण झोपेमुळे झोपेच घोरण्याची समस्या जाणवत नाही. त्यामुळे किमान 7 तासांची झोप घेण्याचा प्रयत्न करा.

रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात एक चमचा हळद आणि एक चमचा मध यांचे सेवन करा. काही दिवस सतत हा उपाय केल्याने तुमची घोरण्याची समस्या कमी होईल.

लसणाचे सेवन करा. घोरण्याच्या समस्येवर लसूण रामबाण उपाय आहे. त्यामुळे झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या खा.

 

 

 

 

हेही पाहा –


संपादन – चैताली शिंदे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.