दौंड तालुक्यात महाआरोग्य शिबिर
esakal September 17, 2024 02:45 AM

केडगाव, ता. १५ : दौंड तालुक्यातील गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा व मोफत उपचार मिळावेत यासाठी महाआरोग्य शिबिर २०२४ चे आयोजन चौफुला येथे केल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
दौंड तालुक्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा व मोफत उपचार मिळावेत यासाठी दौंड तालुक्याचे आमदार कुल यांच्या संकल्पनेतून व कै. सुभाष आण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गुरूवारी (ता. १९) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत श्री बोरमलनाथ मंदिर, बोरीपार्धी (चौफुला) येथे महाआरोग्य शिबिर २०२४ चे आयोजन केले आहे. अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
या शिबिरात पुणे जिल्ह्यातील अनेक नामांकित रुग्णालयांचा सहभाग असून विविध वैद्यकीय तपासण्या, उपचार व नियोजित शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार असून सर्व नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. तपासणी ते संपूर्ण उपचार अशा प्रकारचे हे शिबिर असून, सर्व गरजूंनी या शिबरिाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुल यांनी केले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.