सोमेश्वर शांतीपीठ गोशाळेसाठी १५ लाखाची मदत
esakal September 19, 2024 10:45 PM

- rat१८p२२.jpg-
P२४N१२३५५
रत्नागिरी : सोमेश्वर शांतीपीठ गोशाळेसाठी सुहासी चव्हाण यांच्याकडून मिळालेला मदतनिधी पदाधिकाऱ्यांकडे सुपुर्द करताना भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत. सोबत पदाधिकारी.

सोमेश्वर शांतीपीठ गोशाळेला १५ लाखांची मदत

सुहासी चव्हाण यांचा पुढाकार; शंभर गोप्रेमींना प्रकल्पाशी जोडणार

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : तालुक्यातील सोमेश्वर येथे विश्वमंगल गोशाळा सुरू करण्यात आली आहे. तिथे शहर परिसरातील मोकाट, उनाड गाईगुरांचे संगोपन सुरू आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी या कामाची पाहणी करून मदतीचे आश्वासन दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मंत्री चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सुहासी रवींद्र चव्हाण यांनी शेडसाठी १५ लाख रुपयांची मदत दिली आहे.
गायींच्या संगोपनासाठी शेडची गरज आहे, हे मंत्री चव्हाण यांच्या लक्षात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर व मंत्री रवींद्र चव्हाण यांचा २० सप्टेंबरला वाढदिवस असल्यामुळे सुहासी चव्हाण यांनी गोशाळेच्या शेडसाठी १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मंत्री चव्हाण यांचे स्वीय साहाय्यक अनिकेत पटवर्धन यांनी सातत्याने केलेले सहकार्य व स्मरण या कामी महत्वाचे ठरले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाजप कार्यालयामध्ये दक्षिण रत्नागिरीचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या उपस्थितीत गोशाळेच्या शेडसाठीचा निधी विश्वमंगल गोशाळा कार्यकर्त्यांना देण्यात आला.
कार्यक्रमाला भाजप शहराध्यक्ष राजन फाळके, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत डिंगणकर, राजू भाटलेकर, महिला मोर्चा प्रदेश सचिव शिल्पा मराठे, विक्रम जैन, डॉ. हृषिकेश केळकर, नीलेश आखाडे, शांतीपिठाचे संचालक रवींद्र इनामदार, राजेश आयरे, पाटील, अनुजा पेठकर, ओंकार गर्दे, राकेश वाघ, देवेंद्र झापडेकर, भुरणे, छाया अणावकर, विलास सावंत, विनायक हातखंबकर उपस्थित होते.
----
कोट

सोमेश्वर शांतीपीठ विश्वमंगल गोशाळेच्या माध्यमातून रत्नागिरी शहरातील ५० गायींचे संगोपन सुरू आहे. भविष्यामध्ये २०० ते २५० गायीपर्यंत ही संख्या वाढणार आहे. सर्वांनी गोपालनाच्या संगोपनाला सहकार्य करावे.

- राजेश आयरे
-------

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.