ज्युनियर एटीआरचा चित्रपट दाखवून डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल
नामदेव जगताप September 20, 2024 09:43 AM

Lady Watching Film in OT Viral Video : फिल्म इंडस्टीमधील कलाकार आणि त्यांची फॅन फॉलोईंग हे फार महत्त्वाचं समीकरण आहे. अनेक सेलिब्रिटी असे आहेत, ज्यांचे फॅन्स त्याच्यावर जीवापाड प्रेम करतात. हे प्रेम आणि भावना व्यक्त करणं शब्दांच्या पलिकडे आहे. स्टार्सची फॅन फॉलोइंग फक्त देशातच नाही तर विदेशातही आहे. चाहते त्यांचे आवडते स्टार्स, त्यांचे चित्रपट आणि त्यातील गाणी यांच्याशी फार घट्टपणे जोडले जातात. यामुळे हे स्टार्स जणू त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनतात. अनेक चाहत्यांचे भन्नाट किस्से ऐकायला येतात. अशीच एक काहीशा वेगळी घटना समोर आली आहे. एक चाहती ऑपरेशन थिएटरमध्ये आपल्या आवडत्या स्टारचा चित्रपट पाहत होती आणि त्यावेळी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

ज्युनियर एटीआरचा चित्रपट दाखवून डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया

अनेकांना चित्रपट पाहण्याचं वेड असतं, पण एका चाहतीच्या या छंदाने तिला तिच्या सर्वात कठीण काळात लढण्याची ताकद दिली आहे. आंध्र प्रदेशातील ही घटना समोर आली आहे. ज्यामध्ये महिलेला ऑपरेशन थिएटरमध्ये तिच्या आवडत्या अभिनेत्याचा चित्रपट दाखवण्यात आला. महिला ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रियेच्या वेळी चित्रपट पाहत होती आणि डॉक्टर तिच्यावर शस्त्रक्रिया करत होते.

ऑपरेशन थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला ऑपरेशन थिएटरमध्ये असल्याचं दिसत आहे. यावेळी ती चित्रपट पाहत असल्याचं दिसत आहे. महिला चित्रपटातील कॉमेडी सीन पाहतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

आंध्र प्रदेशातील काकीनाडा शासकीय सामान्य रुग्णालयात (GGH) एका महिला रुग्णावर ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही महिला बऱ्याच दिवसांपासून या समस्येशी झुंजत होती. तिचे हातपाय अनेकदा सुन्न व्हायचे आणि तिला सतत डोकेदुखीचा त्रास व्हायचा. अनेक मेडिकल चाचणीनंतर आढळलं की, तिला ब्रेन ट्युमर आहे. महिलेच्या मेंदूच्या डाव्या भागात अंदाजे 3.3x2.7 सेंटीमीटर गाठ होती.

महिलेचं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन करणं डॉक्टरांपुढे आव्हान होतं. या महिलेची स्थिती गंभीर होती आणि तिला उपचाराची नितांत गरज होती. ब्रेन ट्युमरवरील उपचार महाग असल्यामुळे तिने आपल्यावर उपचार करण्यासाठी सरकारी रुग्णालयाची निवड केली. डॉक्टरांनी सुमारे अडीच तास तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. यावेळी रुग्णाला जागं ठेवणं डॉक्टरांसाठी महत्त्वाचं होतं. त्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान ती महिला तिचा आवडता अभिनेता ज्युनियर एनटीआरचा 'अरडस' चित्रपट पाहत होती. यादरम्यान डॉक्टरांनी तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABP News (@abpnewstv)

 

 

Singham Again : बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.