संग्राम भाऊ, पार इज्जत घालवली! फुसका बार निघाला; अरबाजसोबत डील केल्याने प्रेक्षक भडकले
स्नेहल पावनाक September 20, 2024 10:43 AM

Bigg Boss Marathi  New Season : बिग बॉस मराठीच्या घराला नवा कॅप्टन मिळाला आहे. कॅप्टन्सी टास्क अरबाजने जिंकला असून तो दुसऱ्यांदा कॅप्टन झाला आहे. कॅप्टन्सी टास्कमध्ये घरात फार राडा पाहायला मिळाला. यामध्ये राडा आणि धक्काबुक्कीही झाल्याचं दिसलं. संग्राम आणि अरबाज यांच्यात जोरदार खेचाखेची झाली. अंड्याच्या टास्कमध्ये संग्रामने अरबाजच्या घरट्यात अंड टाकण्यासाठी डिल करण्यास होकार दिला होता. यानंतर संग्रामवर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

अरबाजसोबत डील केल्याने प्रेक्षक संग्रामवर भडकले

संग्राम चौगुले याची बिग बॉस मराठीच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली. पहिल्या आठवड्यात संग्राम दिसलाच नाही आणि दुसऱ्या आठवड्यातही संग्रामला काही खास करता आलेलं नाही. कॅप्टन्सी कार्यात संग्राम अरबाजला घाबरला अशी नेटकऱ्यांकडून टीका होत आहे. संग्राम अरबाजला भिडत नसून तो फुसका लवंगी फटाका असल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत. नेटकरी संग्रामवर भडकले असून सोशल मीडियावर कमेंट करत आपली नाराजी व्यक्त करत आहेत.)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलंय, "संग्राम भाऊ! पार इज्जत घालवली! शो बघा आणि मान्य करा. एकट्या अरबाजनी सगळ्यांना फरफडवलं.", "दिसतंय वैभवची जागा घेतली", "फुसका बार निघाला रे भाऊ, तुमचा काय उपयोग नाही". एकाने लिहिलंय, "दादा तुमच्याकडून खुप अपेक्षा आहेत, महाराष्ट्राला नाराज नका करू दादा." आणखी एकाने लिहिलंय, "संग्राम दादा तुम्ही अरबज सोबत डिल नको करायला पाहिजे, कारण दुसऱ्या फेरीमध्ये जान्हवी आणि तुम्हाला बाद करण्याचं ठरलं आहे".


Bigg Boss Marathi : बाईईई... निक्की खरी मास्टरमाइंड! आधी अभिजीत, आता संग्राम; अरबाजच्या पाठीमागे फुलतेय नवी मैत्री

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.