Fashion : 'सोन्याच्या साडीत सजले रुप, नाकात नथनी, गाली लाली अन् गजरा..! अदिती रावचा ब्राईडल लूक होतोय व्हायरल
एबीपी माझा वेब टीम September 20, 2024 10:43 AM

Fashion : बॉलिवूड आणि साऊथची लोकप्रिय अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao hyadri) अखेर विवाहबंधनात अडकली. अभिनेता सिद्धार्थला दीर्घकाळ डेट केल्यानंतर आदिती राव वयाच्या 37 व्या वर्षी नववधू बनली. अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने गुपचूप लग्न केल्याची चर्चा सुरू असतानाच सिद्धार्थ आणि आदितीने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांच्या लग्नाचे आतील फोटो शेअर केले. आदिती आणि सिद्धार्थने अगदी साध्या पेहरावात लग्नविधी पार पाडले, त्यांच्या या लूकचे सर्वत्र कौतुक होतंय, त्यांचा हा लूक सर्वत्र व्हायरलही होतोय. एकदा पाहाच..

अगदी साध्या स्टाईलने उपस्थितांची जिंकली मने

सिद्धार्थ आणि आदिती या जोडप्याने पारंपारिक दक्षिण भारतीय पद्धतीने लग्न केले. हे दोघेही अगदी साध्या स्टाईलमध्ये वधू-वराच्या रुपात दिसत आहेत. सिद्धार्थ आणि आदिती हार घालून मंडपात आशीर्वाद घेत आहेत. आदिती आणि सिद्धार्थच्या लग्नाची खास गोष्ट म्हणजे या दोघांनी संसाराच्या थाटापासून दूर राहून अतिशय साधेपणाने लग्न केले होते. विशेषत: वधू-वरांचे लूक पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

नववधूची साडी खास! गोल्डन टिश्यू ऑर्गन्झा लेहेंगा-साडी

अदितीने तिच्या खास दिवसासाठी सोनेरी जरी वर्क असलेली एक भारी टिश्यू ऑर्गन्झा लेहेंगा-साडी परिधान केली होती. तिने हे गोल्डन ब्लाउज आणि हेवी वर्क दुपट्ट्यासोबत मॅचिंग केले आहे. त्यावर अदितीने पारंपारिक सोन्याचे, रुबीचे दागिने घातले आहेत. तिच्या सैल वेणीत गजरा घालून तिचा वधूचा लुक पूर्ण केलाय. चाहत्यांच्या नजरा अभिनेत्रीच्या नाकातील नथनीवर खिळल्या होत्या.

हातावर साधी मेहंदी

लग्नासारख्या मोठ्या दिवशी वधू बनलेल्या आदितीने हातावर साधी मेहंदी लावली आहे. तिने तिच्या तळहातावर चंद्र बनवला आहे. तेलंगणातील 400 वर्षे जुन्या श्रीरंगपूर मंदिरात या जोडप्याचा विवाह झाला. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. येथे दरवर्षी सुमारे 300 विवाह होतात. असे मानले जाते की, या मंदिरात लग्न करणाऱ्या कोणत्याही जोडप्याचे वैवाहिक जीवन यशस्वी होते.


नवरदेवाचाही अनोखा अंदाज

लग्नासाठी, सिद्धार्थने बारीक नक्षी असलेला पांढरा कुर्ता घातला होता, जो त्याने पारंपारिकतेशी जोडला होता. हा अभिनेता दक्षिण भारतीय वर म्हणून अगदी शोभून दिसतोय.सिद्धार्थ आणि आदितीच्या लग्नाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र, या जोडप्याने अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही. दोघांची साधी शैली लोकांमध्ये चर्चेत आहे. अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत, जे पाहून त्यांचे चाहते या जोडप्याचे खूप अभिनंदन करत आहेत.

Fashion : सोनेरी नक्षी..काळ्या अनारकलीत अवतरली अप्सरा..! 50 वयातही विश्वसुंदरीचा जलवा कायम, दुबईत माय-लेकीचा भारतीय अंदाज, एकदा पाहाच..

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.